Home नांदेड पावसाने मारली दडी शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट

पावसाने मारली दडी शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट

109

आशाताई बच्छाव

1001632612.jpg

पावसाने मारली दडी शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट !

मुखेड तालुका कृषी वार्तापत्र !

– विठ्ठल पाटील
———————
मुखेड । प्रतिनिधी

मुखेड तालुक्यांतील ९० टक्के शेक-यांनी सोयाबीन, कापूस, तुर, मुग व उडीद इत्यादी पिकांची पेरणी केलेली आहे. परंतु जुन महिन्यात मृग नक्षत्राच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. यामुळे आता शेतकरी राजांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत.
कारण शेतकऱ्यांनी मशागतीला नांगरणी, रूटावैटर व वखरणीला सहा हजार रुपये, सोयाबीनची बैग ३००० हजार रूपये, खताची बॅग १७०० रूपये, ट्रॅक्टर चे भाडे १००० रूपये, एकरी १२ ते १३ हजार रूपये खर्च करून बसले आहेत. परंतु वरूण राजाने या कडे डोळे मिटल्यामुळे शेतकरी
चिंताग्रस्त असुन अगोदरच कर्जबाजारी होऊन बसला आहे. जुन महिना पूर्ण उघडा गेल्यामुळे काही शेतकऱ्यांचे बी उगवले नाही तर काही शेतकऱ्यांचे उगवलेले रोपटे पावसाविना होरपळून गेली आहेत.

शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट !

अता दुबार पेरणी कशी करावी त्यासाठी पैसे कुठून आणावे म्हणून शेतकरी चिंतेत असुन पावसाने पाठ फिरविल्याम ागणी

ळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहेत. आणि या कारणानेच शेतकऱ्यांवर कर्ज बाजारीची वेळ आली आहे.

दुबारा पेरणीसाठी खते बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

संबंधित सत्ताधारी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत खत व बियाणे उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी शेतकरी करीत आहेत.