Home नांदेड जिल्हा युवा पुरस्कारासाठी संदिप कळासरे यांची निवड 1 मे रोजी मुख्य ध्वजारोहण...

जिल्हा युवा पुरस्कारासाठी संदिप कळासरे यांची निवड 1 मे रोजी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त खेळाडुंचा होणार गौरव.

171

आशाताई बच्छाव

1001458987.jpg

जिल्हा युवा पुरस्कारासाठी संदिप कळासरे यांची निवड

1 मे रोजी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त खेळाडुंचा होणार गौरव.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड :- जिल्हास्तर युवा पुरस्कार निवड समितीमार्फत सन 2024-25 (युवक) करीता संदिप हरीभाऊ कळासरे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरुप 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असुन सदरचा पुरस्कार महाराष्ट्र दिन 1 मे, 2025 चा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23 चा अजय माधव पेंदोर (आंतरराष्ट्रीय बॉक्सींग खेळाडू) रा. किनवट व सन 2023-24 चा लताताई परमेश्वर उमरेकर (पॅरा ऑलम्पिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू) रा. नांदेड यांना महाराष्ट्राचे मा. राज्यपाल महोदय व इतर मान्यवर यांच्या हस्ते बालेवाडी पुणे येथे गौरविण्यात आले असल्याने ते नांदेड जिल्हयाचे रहिवाशी असल्याने अजय माधव पेंदोर व लताताई परमेश्वर उमरेकर यांचा सुध्दा महाराष्ट्र दिन रोजी मान्यवरांच्य हस्ते यथोचीत सत्कार करण्यात येणार आहे.

राज्याचे युवा धोरण सन 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय 12 नोव्हेंबर 2013 अन्वये जिल्हयात कार्यरत असलेल्या युवक, युवतीं व नोंदणीकृत संस्थानी केलेल्या समाजहिताच्या उल्लेखीत कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी जिल्हयातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थाकडून जिल्हा युवा पुरस्कार सन 2024-25 या वर्षाच्या युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुषंगाने प्राप्त प्रस्तावाची जिल्हास्तर युवा निवड समितीच्यावतीने छाणणी करुन अंतिम पुरस्कारार्थीची नावे निवडण्यात आली आहेत.

जिल्हयातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, राज्य क्रीडा पुरस्कारार्थी, विविध एकविध खेळ संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी यांनी दिनांक 1 मे, 2025 रोजी वेळ सकाळी 8 वा. पोलीस परेड मैदान वजिराबाद नांदेड येथे मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

Previous articleभोकरदन पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी पदी महेंद्र साबळे यांची नियुक्ती
Next articleझाप ग्रामपंचायत मधे सरपंच आपल्यादारी कार्यक्रमाचा लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांच्या हस्ते शुभारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.