आशाताई बच्छाव
विरदेल येथे उपसरपंच पदी श्रीमती वैजंताबाई यांची बिनविरोध निवड (विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील ) शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील श्री. विठ्ठल देवमन मोरे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागा राहिल्या मुळे.विरदेल ग्रामपंचायत चे गट प्रमुख श्री.सतिष गोटू बेहेरे यांनी सौ. सरपंच सुवर्णा सतिष बेहेरे यांच्या अध्यक्षतेखाली ठरल्याप्रमाणे श्रीमती वैंजताबाई भगवान गावित यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.. श्रीमती वैजंताबाई गावित यांच्या कडून विरदेल गावाचा लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने विकास व्हावा हीच पेक्षा विरदेल गावाच्या नागरिकांकडून करण्यात येत आहे त्याप्रसंगी… विरदेल गावाचे सरपंच सौ सुवर्णा सतीश बेहेरे ग्रामसेवक सौ पुनम शिंदे, गटनेते श्री सतीश गोटू बेहेरे ग्रामपंचायत सदस्य.. श्री राजेंद्र बेहेरे. श्री आबा साहेब राजपूज. श्री. गोकुळ बछाव. सुनील कोळी ग्रामपंचायत कर्मचारी.श्री नरेंद्र धनगर.श्री.जितू पेंढारकर श्री.दीपक कुंभार. श्री.अविनाश कोळी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश बेहेरे. प्रमोद बेहेरे.. व युवा कार्यकर्ते श्री गोविंद बेहेरे.. पीयूष बेहेरे.. नामदेव गावित..विकी पाटील व इतर गावातील नागरिक उपस्थित होते






