आशाताई बच्छाव
चाळीसगावात बसच्या कंडक्टरला मारहाण प्रकरणी प्रवाशांच्या विरोधात गुन्हा
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – एसटी बस प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी केली म्हणून प्रवाशांनी कंडक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आगार प्रमुखांना देखील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व शासकीय कामात अडथळा आणला म्हणून खेरडे तांडा येथील तिघांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव आगाराची एमएच.20 बीएल.2406 ही बस शुक्रवारी सकाळी 6.50 वाजता चाळीसगाव ते खेरडे अशी फेरी मारत असतांना बाणगाव ते रांजणगाव दरम्यान बसमध्ये 120 ते 125 प्रवाशी असल्याने बसचा वाहक सुनील ताराचंद जाधव रा. सांगवी यांनी बस चालक जिजाबराव सोनवणे यांना प्रवाशांच्या तिकीट बुकींगसाठी बस रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितले. यावेळी खेरडे येथील रोहीत जाधव, प्रकाश जाधव, गोविंद जाधव सर्व रा. खेरडे यांनी बस थांबवली म्हणून वाहक सुनील जाधव यांना शिवीगाळ करून हाताचापटांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा जर तिकीट बुकींग केली तर मारझोड करू अशी धमकी दिली.
बस चाळीसगाव आगारात आली असता तेथे आगार प्रमुख मयुर पाटील यांना देखील या तिघांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यात वाहक सुनील ताराचंद जाधव यांच्या अंगावरील सरकारी गणवेश फाडून नुकसान केले व बसमधील प्रवाशांना तिकीट काढू न देता वाहकास दुखापत करून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून वाहकाच्या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 132, 115(2), 352, 351(2), 324(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.