आशाताई बच्छाव
उमरगा : उमरगा तालुक्यातील मौजे समुद्राळ येथे बगिचा साठी असलेल्या राखीव जागेत गौण खनिजाची साठवणूक करत असल्याचे पंचनामे केले जात नाही तोपर्यंत अवैध गौण खनिज वर बसून नरेंद्र पाटील हे आज पासून ठिय्या आंदोलन करत आहेत. समुद्राळ हे गाव भुकंप पुनर्वसित असुन या गावचा आराखडा नगरपंचायत विभाग धाराशिव यांचे कडून मंजूर असून दलित वस्ती योजने अंतर्गत रस्ता मंजूर झालेला असून यापुर्वी रस्ता बांधकाम करण्यात आलेला आहे.रस्त्याच्या काही भागात जवळच्या घरमालकांनी अतिक्रमण केलेले असल्याने, या रस्त्याचे काम चालू असताना अवैध गौण खनिजाचा वापर केला जात आहे.तेंव्हा अशा गौण खनिजाचा पंचनामा केला जात नाही.म्हणून आज दि २६/०३/२०२५ पासून नरेंद्र पाटील साठवलेल्या अवैध गौण खनिजावर बसून बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत.






