
आशाताई बच्छाव
जिल्हा परिषद मराठी शाळेचा काळा कारभार लपविण्यासाठी पत्रकाराची बदनामी
मुख्य कार्यकारी अधिकात्यांनी काळा कारभार उघड आणण्याची गरज.
जितेंद्र गाडेकर, जालना.
बुलढाणा जिल्ह्यातील, डोणगाव येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका वर्षा गोपाल लांभाडे व जिल्हा परिषद कन्या शाळेतील सहाय्यक शिक्षक गोपाल लांभाडे यांनी जाणीवपूर्वक डोणगाव येथील काही व्हाट्सअप ग्रुप वर प्रल्हाद खोडके यांच्यातील संवादाच्या व्हिडिओ दिनांक 21 मार्च रोजी व्हायरल केला होता.बदनामी करण्याच्या हेतूने शिक्षक दांपत्याने वायरल केलेल्या व्हिडिओ बद्दल प्रल्हाद खोडके यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे
वारंवार पैशाची मागणी पूर्ण न करू शकल्या मुळे पत्रकार खोडके बदनामी करतो पंचायती करतो निलंबनाचे अधिकार दिले असे बदनामी कारक व्हिडिओ पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल केली होती सदर ३.१० सेकंदाच्या व्हिडिओत प्रल्हाद खोडके मागील दोन वर्षा पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दल माहीती मागण्यास गेले असता शिक्षका सौ वर्षा लांभाडे त्यांचे मोबाइल वर व्हिडीआ बनवुन त्यामध्ये असे म्हणतात की, तुम्ही सर्वच पत्रकार माझ्याकडुन पैसे घेवुन जातात. असा व्हिडीआ दोन्ही पती पत्नी नी दोन्ही व्हाटसअप ग्रुपला ला प्रसिध्द करून पत्रकार प्रल्हाद खोडके व सहकारी पत्रकारांची बदनामी केली आहे या व्हिडीओ मध्ये म्हटल्या प्रमाणे तुम्ही सर्व पत्रकार माझ्याकडून पैसे नेता तर पत्रकारांना पैसे देण्यासारखे काय काळे काम या शाळेत सुरू आहे असा प्रश्न जनता विचारत आहे तरी त्यांचेवर नियमाप्रमाणे कार्यवाही व्हावी अशी तक्रार डोणगाव पोलिसात दाखल केली आहे.