आशाताई बच्छाव
मागणी मान्य व्हावी म्हणून श्रीरामपूरात आंबेडकरी चळवळीच्या वतीने सर्वपक्षीय जोरदार निदर्शने.
श्रीरामपूर (दिपक कदम) बिहार येथील बुद्धगयातील भिक्खू संघाने पुकारलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी तसेच महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या ब्रिटिश कालीन बौद्धगया ॲक्ट रद्द करा,महाबोधी महाविहारात सर्व विश्वस्त बौद्ध असले पाहिजे या मागणीसाठी येथील रिपाई, भारतीय बौद्ध महासभा,वंचित बहुजन आघाडी,बसपा आणि दलित चळवळीतील सर्व पक्ष संघटना सर्वपक्षीय यांच्या वतीने येथील प्रांत कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात येऊन मागणीचे निवेदन देण्यात आले.
प्रसंगी नायब तहसीलदार वनिता कलापुरे यांना निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बिहार येथील बुद्ध गया येथे तथागत शांतिदूत गौतम बुद्ध यांना अडीच हजार वर्षापूर्वी सम्यक ज्ञान प्राप्त झाले असून येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र स्थान आहे.बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धाच्या ताब्यात असले पाहिजे महाबोधी विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे नैसर्गिक न्याय ठरेल कारण हिंदू मंदिरे हिंदूंच्या ताब्यात मुस्लिमांची मज्जिद मुस्लिमांच्या ताब्यात ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात मग बौद्धांचे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात का?नाही म्हणून १९४९ द बुद्धगया टेम्पल ॲक्ट मध्ये सुधारणा करून महाबोधी महाविहारला लागू असलेला बुद्धगया टेम्पल ॲक्ट कायदा रद्द करून संविधानाच्या चौकटीत म्हणजे भारतीय संविधानानुसार कायदा करून त्या कायद्याद्वारे ट्रस्ट स्थापन करून महाबोधी महाविहार सर्व विश्वस्त बौद्ध असले पाहिजे असा कायदा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात ही जगभरातील बौद्धांची मागणी बिहार सरकारने मान्य करावी अन्यथा देशात बौद्ध समाज उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा येथील सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे.
यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर गौतम पगारे बसपाचे प्रभारी सुनील मगर वंचित तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन राष्ट्रवादीचे सरचिटणीस अशोक बागुल स्वराज्य पक्षाचे विजय खाजेकर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रमा धीवर पी.एस.निकम रविंद्र गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सुनील शिरसाठ विजय पवार मोहन आव्हाड मनोज काळे राजू गायकवाड सुरेश जगताप राजेंद्र मगर संजय बोरगे विशाल सुरडकर शिवा साठे प्रवीण साळवे नवनाथ गुडेकर किरण खंडागळे झाकीर शहा मच्छिंद्र ढोकणे प्रकाश अहिरे किशोर ठोकळ मिलिंद धीवर गोरख आढाव रितेश एडके सी.एस. खरात एल.एन.मस्के अनिल रणदिवे मोजेस चक्रनारायण हितेश पवार ॲड.अण्णासाहेब मोहन अनिल उबाळे रामदास त्रिभुवन वैशाली अहिरे उज्वला येवलेकर सचिन भोसले रितेश काटे सुशीला सातदिवे संगीता गायकवाड रत्नमाला गायकवाड कडूबाई पवार राणी पांचाळ सुनीता दाभाडे अंतोन शेळके मंगेश शेजवळ एस.एस. बोर्डे संदीप लोखंडे सुगंधरा इंगळे अशोक बोरुडे सुरेंद्र पानपाटील वसंत लोखंडे वसंत साळवे तसेच यावेळी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुभाष त्रिभुवन यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनील शिरसाठ यांनी मानले.