आशाताई बच्छाव
शनिमूर्तीवर ब्रँडेड तेलाचा श्रीगणेशा
शनि मंदिर, शिंगणापूर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
ट्रस्टने जाहीर केल्याप्रमाणे संशयास्पद असलेले केमिकलयुक्त तेल मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले.
देवस्थान ट्रस्टने बंदी घातलेले कोट्यवधी रुपयाचे पॅकिंग तेल गावातील दुकानात असल्याने नवीन नियमानंतर त्या तेलाचे काय करायचे काय? असा प्रश्न ठोक विक्रेत्यात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दर्शनपथच्या तोंडाला सुरक्षा
66 माहितीत असलेल्या तेलाबरोबर काही नवीन कंपन्यांचे तेल छापील स्टिकर्स लावून आले आहे. या तेलाचे नमुने घेऊन दोन दिवसांत अन्नभेसळ प्रशासनाकडून तपासणी केली जाईल. नियमात बसत नसेल, तर त्यावर बंदी घातली जाईल.
-जी. के. दरंदले, मुख्य कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान ट्रस्ट
कर्मचारी तैनात करण्यात आले होते. इंडिया, स्वराज व प्रिया नाव असलेले तेल अडविण्यात आले होते. यानंतर बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर पुन्हा वरील तेल मंदिरात नेण्यास परवानगी देण्यात आली. आज मंदिर परिसरात भेट दिली
असता भाविकांनी नवीन निर्णयाचे स्वागत केले. देवस्थानने ब्रँडेड तेलाच्या नावाखाली बनावट तेलाचा शिरकाव होणार नाही व तेल विक्रीच्या रकमेवर नियंत्रण ठेवावे, असे सरपंच बाळासाहेब बानकर यांनी सांगितले.