आशाताई बच्छाव
जनता विद्यालय सुतारखेडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
चांदवड सुनील गांगुर्डे तालुका प्रतिनिधी –दि.28 फेब्रुवारी 2025 शुक्रवार रोजी थोर भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामण यांच्या सन्मानार्थ विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजन व सी.व्ही.रामण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामधे विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे सादरीकरण, तसेच अंधश्रद्धेवर आधारीत नाटिका, मला वैज्ञानिक व्हायचंय यावर विद्यार्थी मनोगत,शिक्षक मनोगत इत्यादी उपक्रम साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक श्री.पाटील व्ही. एस.हे होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.कांबळे एस एस,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री.सोनवणे सर,श्री.जामदार सर तसेच उपशिक्षिका श्रीम.जाधव मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमासाठी शेळके सर,पवार मॅडम,वाघ सर,ठाकरे मॅडम,गायकवाड भाऊसाहेब, किरण उघडे,किशोर शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 9 वी च्या विद्यार्थिनींनी केले. व आभार प्रदर्शन श्रीम.ठाकरे मॅडम यांनी केले. अशा प्रकारे विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात व आनंदाने पार पडला.