आशाताई बच्छाव
पत्रकार दिनानिमित्त ५८ जणांनी केले रक्तदान
व्हाईस आँफ मीडियामुखेड चा उपक्रम
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ साली ‘दर्पण’ या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित करुन मराठी वृत्तपत्राचा पाया रचला. राज्यात दरवर्षी दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मुखेड शहरात ६ जानेवारी रोजी व्हाईस आँफ मीडिया शाखा मुखेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष डाॅ. गणेश जोशी यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष शेख हसनोद्दीन उर्फ बबलु मुल्ला यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात ५८ रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. यारक्तदान शिबिरास तहसीलदार राजेश जाधव, काँग्रेस प्रदेश सचिव डाॅ.श्रावण रॅपनवाड, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक शिवाजी कराळे, शेतकरी नेते शिवशंकर पा. कलंबरकर, आँल इंडिया तन्जीम ए इन्साफचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख, मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड, नाहेद सय्यद, आदींनी भेट देवून पत्रकार बबलु मुल्ला व व्हाईस आँफ मीडियाच्या कार्याचे कौतुक केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी जेष्ठ पत्रकार माधव वारे, मुस्तफा पिंजारी, सय्यद नईम मुल्ला, इसाक सलगरकर,
रणजित जामखेडकर,
आदींनी प्रयत्न केले.






