Home नांदेड पाच दिवसीय भव्य विक्री प्रदर्शनचा थाटात शुभारंभ

पाच दिवसीय भव्य विक्री प्रदर्शनचा थाटात शुभारंभ

75

आशाताई बच्छाव

1001128356.jpg

पाच दिवसीय भव्य विक्री प्रदर्शनचा थाटात शुभारंभ

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 7 जानेवारी :- स्वयं सहायता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची भव्य विक्री प्रदर्शनाचे आयोजन 6 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये मल्टीपर्पज हायस्कुल वजिराबाद नांदेड येथे करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते या भव्य विक्री प्रदर्शनाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जि. ग्रा वि.यं., जि. प. नांदेड यांच्यामार्फत आयोजित या विक्री प्रदर्शनामध्ये नांदेड जिल्हातील स्वयंसहायता समुहातील महिलासह अकोला, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर, लातूर, परभणी, अहिल्यानगर, हिंगोली इ जिल्हातील उत्कृष्ट उत्पादने घेऊन महिलांनी सहभाग नोंदवला आहे. या प्रदर्शनाला नांदेडकराचा उस्फुर्त सहभाग मिळत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्या मार्गदर्शनाखाली या मिनी सरसचे आयोजन करण्यात आले आहे.
मिनी सरस विक्री प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, सर्व जिल्हा व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी प्रयत्न केले आहेत.

Previous articleसंस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूल देगलूर येथे पत्रकार दिन साजरा
Next articleपत्रकार दिनानिमित्त ५८ जणांनी केले रक्तदान व्हाईस आँफ मीडियामुखेड चा उपक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.