आशाताई बच्छाव
अहिल्या नगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी – मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई येथे मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सन्माननीय उदयन दादा गडाख यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात आज एआईसीटीई अंतर्गत बीबीए आणि बीबीए(सीए) विभागात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम आयोजित केला. प्राचार्य डॉ. शंकर लावरे सर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रा.डॉ. सय्यद लियाकत यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने व प्रा.महेश बहीरट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. शंकर लावरे सरांनी महाविद्यालय मध्ये असणाऱ्या सोयी सुविधा तसेच भविष्यकाळातील संधी बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाकरिता विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते. विविध मनोरंजक उपक्रमांनी कार्यक्रमाची सांगता झाली.






