Home जळगाव पोलिस स्थापना दिनानिमित्त चाळीसगाव पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली कामकाजाची माहिती

पोलिस स्थापना दिनानिमित्त चाळीसगाव पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली कामकाजाची माहिती

78

आशाताई बच्छाव

1001115405.jpg

पोलिस स्थापना दिनानिमित्त चाळीसगाव पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली कामकाजाची माहिती

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस रेझिंग डे सप्ताह निमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमात पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय विद्यालय अंधशाळा, हरिभाऊ चव्हाण प्राथमिक विद्यालय,
नालंदा विद्यालय चाळीसगाव, भास्कराचार्य इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे आणि महाविद्यालयांतील एकूण 380 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना चाळीसगाव पोलीस स्टेशन ला बोलावून पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स पो नी सागर कोते व कर्मचारी यांनी पोलीस ठाण्याचे कामकाज, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, आणि पोलीस यंत्रणेचे कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने अशाच प्रकारचे उपक्रम पुढील दिवसांत राबविण्याचा मानस असल्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सांगितले.
यासाठी परिश्रम गोपनीय शाखेचे हवालदार पंढरीनाथ पवार, भटू पाटील, प्रवीण जाधव व कर्मचारी यांनी घेतले.

Previous articleचाळीसगाव येथे हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी
Next articleपंतजली योग भवन बा-हाळी येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जंयती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.