आशाताई बच्छाव
धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकट हेक्टरी 50 हजार रुपये बोनस द्यावा._ मुख्यमंत्री यांना निवेदन. .
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्यात आले की मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने तत्काळ बोनस देऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत आर्थिक मदत केली होती. यावर्षी सरकार बसण्यास उशीर झाला असून सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना अजून पर्यंत महाराष्ट्र शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट बोनस जाहीर केलेले नाही .ही अत्यंत वेदनादायी बाब असल्यामुळे आज दिनांक 19/ 12/ 2024 रोजी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे, पुरुषोत्तम गायधने, नितेश बोरकर, इंद्रजीत येळणे, विकास निंबार्ते, राजू थोटे ,दिनेश रागवते, चंद्रशेखर खोब्रागडे, चंद्रशेखर बनकर, यांनी निवेदन दिले की सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मान्यता देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट बोनस देण्यात यावाअशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने करण्यात आली.