आशाताई बच्छाव
वन्यप्राण्यांच्या संदर्भात शासन गंभीर नाही का? – इथे रोज अपघातात जातात वन्यजीव ! कधी होणार बायपास ?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-लोणार वन्यजीव निसर्ग चक्रातील घटक असून त्यांचे जर रोजच जीव जात असतील तर हा गंभीर प्रश्न आहे. हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात का उठत नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावरून मंठा व संभाजीनगर असे दोन हायवे जोरात चालू असतात अनेक वाहने या रोड वरून भरधाव वेगाने वाहत असतात हे रस्ते सरोवराच्या अगदी लागून गेलेले
आहेत त्यामुळे सरोवरात धोका निर्माण झाला आहे. सरोवराच्या पूर्वेकडील भाग ढासळत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
माणसाच्या अस्तित्वासाठी आणि निसर्गाच्या संतुलनासाठी वन्यप्राण्यांची दिवसेंदिवस घटत जाणारी संख्या ही एक गंभीर समस्या आहे. स्वार्थी वृत्तीची माणसं वन्यप्राण्यांच्या जीवावर उठली आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जैवविविधता अनेक संकटाशी सामोरे जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातही वन्य प्राण्यासह पक्षांच्या रस्ता अपघाताचे प्रमाण अधिक आहे व यात लोणार तालुक्यात सर्वात जास्त या घटनां होत आहेत. त्यासाठी हे रस्ते बायपास होणे गरजेचे आहे.’ मी लोणारकर टीम’ सतत
वन्यप्राण्यांच्या व पक्ष्यांच्या तसेच सरोवराच्या संवर्धनासाठी अग्रेसर असते पण बऱ्याच वेळा प्राण्यांचा जीव वाचवण्यात यश येत नाही. भौगोलीक परिस्थिती प्रमाणे रस्त्याचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. नेहमी स्थलांतर करणारे प्राणी एकपेक्षा अधिक अधिवासाचा वापर करतात. वन्यजीवांना त्यांच्या हंगामी काळात जास्त प्रमाणात मार्गक्रम करावा लागतो. भरधाव वेगात सुटणाऱ्या वाहनांच्या अपघातात वन्यप्राणी आपला जीव कायमचा गमवून बसतात. दरवर्षी लाखोपेक्षा जास्त प्राण्याचा मृत्यू होतो. लवकरात लवकर सरोवराजवळ रस्त्यांना बायपास व्हावा ही ‘मी लोणारकर टीम’ ची मागणी लवकर पूर्ण व्हावी वन्यजीव वाचावे.. कारण ही गांभीर्याने घेणारी बाब आहे.