Home उतर महाराष्ट्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आगमन दिनाला बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर उपस्थित

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आगमन दिनाला बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर उपस्थित

17
0

आशाताई बच्छाव

1001064135.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आगमन दिनाला बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर उपस्थित
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे 16 डिसेंबर 1939 रोजी बेलापूर स्टेशनला आले होते रेल्वे स्टेशनवर उतरून हरेगाव या ठिकाणी महार वतन परिषदेत उपस्थित राहिले होते त्या ऐतिहासिक दिनाला 85 वर्ष पूर्ण झाले आहे त्या दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने बेलापूर रेल्वे स्टेशन समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात आली होती त्या प्रतिमेस भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी रेल्वे स्टेशनचे स्टेशन प्रबंधक एमपी पांडे यांना रेल्वे स्टेशनवर बाबासाहेब आले होते त्याची माहिती असलेले प्रतिमा रेल्वे स्टेशनवर लावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन भारतीय बौद्ध महासभेचे गौतम पगारे सुगंधराव इंगळे सरिता सावंत यांच्या हस्ते भेट देण्यात आली त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले की महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर बेलापूर रेल्वे स्टेशनला 85 वर्षांपूर्वी आले होते आजच या ऐतिहासिक दिनी देखील बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर आल्यामुळे आम्ही श्रीरामपूरकरांचे भाग्य समजतो लवकरच भीम अनुयायांचे स्वप्न साकार होणार असून बेलापूर रेल्वे स्टेशनला लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली त्यावेळी रिपाईचे राजू गायकवाड सुनील शिरसाठ सुरेश जगताप बहुजन टायगर फोर्स चे अध्यक्ष संजय रूपटक्के विशाल सुरडकर गुड्डू पंडित रितेश एडके अशोक लोंढे वसंत साळवे गोरख आढाव सुरेश शिवलकर विश्वास भोसले वंचितचे किशोर ठोकळ प्रवीण साळवे नवनाथ गुडेकर दर्शनाताई काळे संगीताताई गायकवाड जयश्री पवार वंदनाताई गायकवाड आदी उपस्थित होते बेलापूर रेल्वे स्टेशन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने विद्युत रोषणाई करून साऊंड सिस्टिम लावून पेढे वाटून महामानवाच्या आगमन दिनाचा जल्लोष साजरा करण्यात आला

Previous articleआजपासून मुळा धरणातून सुटणार पाण्याचे आवर्तन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here