आशाताई बच्छाव
दान केल्याचे कोणाला सांगू नका : राऊत महाराज
नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी परिवारात अहंकार
जन्माला यायला नको. दान दिल्यास पुण्य मिळते, पण दिलेले दान मी दिले, मी दिले असे कुणालाही सांगू नये, जर सांगितलेच तर ते दिलेले दान व त्यामुळे मिळालेले पुण्य हे नक्की झिरो झाल्याशिवाय राहात नाही. योगाचे आठ अंग आहेत. त्यापैकी योगसाधना ही अत्यंत महत्वाची साधना असल्याचे निरुपण घोडेगाव येथील श्री सद्गुरू पंढरीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप रामेश्वर महाराज शास्त्री राऊत यांनी केले. हनुमानवाडी (सोनई) येथील
स्व. त्रिंबक यशवंत येळवंडे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त राऊत महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी संतपूजन युवा नेते प्रकाश शेटे व जालिंदर येळवंडे यांच्या हस्ते झाले. आपल्या कीर्तन सेवेत महाराजांनी अनेक दाखले दिले. त्यात गाढव कधी पंढरपूरला जात नाही. जीवनातील वेगवेगळ्या तीन आश्रमाचे महत्वसुद्धा महाराजांनी पटवून दिले. लव्ह जिहाद करू नका. जीवनात गुरुकृपा महत्वाची असल्याचे ते म्हणाले. भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे, दादासाहेब दरंदले, मुळा बँकेचे चेअरमन
भाऊसाहेब निमसे, सीताराम झिने, जालिंदर येळवंडे, जि. प. सदस्य अशोकराव साळवे, रमेश कांबळे, गोरख दरंदले, चंद्रभान बडे मामा, सुभाष राख, हभप लक्ष्मण तांदळे, हभप शिकारे मामा, डॉ. माऊली दरंदले, शिकारे गुरुजी, डॉ. बाबासाहेव शिरसाठ, उद्धव आव्हाड, हभप कैलास महाराज फलके, हभप सुधीर शेटे, रमेश कांबळे, संदीप कुसळकर, अनिल निमसे, भागवताचार्य हभप उपा दीदी, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पत्नी जयश्रीताई लंघे, माधवराव घुगरकर आदी उपस्थित होते.