Home भंडारा पवनी तालुक्यातील सुरबोडी गावाचे तात्काळ पुनर्वसन करा या मागणीकरिता

पवनी तालुक्यातील सुरबोडी गावाचे तात्काळ पुनर्वसन करा या मागणीकरिता

127
0

आशाताई बच्छाव

1001064090.jpg

पवनी तालुक्यातील सुरबोडी गावाचे तात्काळ पुनर्वसन करा या मागणीकरिता

 

ग्रामस्थांचे गोसे धरणात जलसमाधी आंदोलन; पोलीस व महसूल यंत्रणा आंदोलनस्थळी

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील सुरबोडी गावाला गोसे धरणामुळे बेटाचे स्वरूप आले आहे. गावातील ९३ टक्के शेतजमीन गोसे प्रकल्पात संपादीत करण्यात आली. केवळ तेथील लोकांकडे ७ टक्के शेतजमीन आहे. गावाच्या सभोवताल धरणातील पाण्याने वेढलेले आहे.
शासन-प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ सुरूच
रोजगाराचा अन्य साधन नसताना शासनाने सुरबोडी गावाचे पूनर्वसन केले नाही. वारंवार मागणी करूनही शासन-प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. गावाचे पूनर्वसन, बिबट्याचा बंदोबस्त तसेच शासनाचे सन २०११ चे पत्र तातडीने काढण्यासंबंधी दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी संतप्त ग्रामस्थांनी गोसे धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. आंदोलनस्थळी पूनर्वसन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार पवनी तसेच अड्याळचे ठाणेदार धनंजय पाटील पोलीस ताफ्यासह आंदोलनस्थळी ठाण मांडून होते.

Previous articleपुणे येथील पुस्तक महोत्सवात छोट्या लेखिकेने वेधले वाचकांचे लक्ष
Next articleदान केल्याचे कोणाला सांगू नका : राऊत महाराज
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here