Home बुलढाणा पुष्पा 2′ पाहायला गेले अन् परत आलेच नाही, ३ जिवलग मित्रांचा दुर्दैवी...

पुष्पा 2′ पाहायला गेले अन् परत आलेच नाही, ३ जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

45
0

आशाताई बच्छाव

1001053994.jpg

‘पुष्पा 2’ पाहायला गेले अन् परत आलेच नाही, ३ जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणाः बुलडाण्यामध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे. अज्ञात वाहनांने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ चुलत भाऊ आणि मित्राचा समावेश आहे. मृत तरुण हे चिखलीवरून उदयनगर येथे जात होते असताना काल रात्री उशिरा ही घटना घडली. अमडापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमडापूर येथे राहणारे प्रतिक भुजे (२५ वर्षे), प्रथमेश भूजे (२६ वर्षे) आणि सौरभ शर्मा (२४वर्षे) हे तिघे मित्र पुष्पा २ चित्रपट पाहण्यासाठी दुचाकीवरून चिखली गेले होते. चित्रपट पाहिल्यानंतर मध्य रात्री दीडच्या सुमारास
परत आपल्या गावी येत होते.

त्याचवेळी अमडापूर गावाजवळ टिपू सुलतान चौकात एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली की तिघेही फेकले गेले. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज आल्याने बाजूला असलेल्या टायर पंचरच्या मजुराला जाग आली आणि तो अपघातस्थळी धावत गेला. तेव्हा त्याला तिघेही तरुण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले दिसले. अपघातामध्ये दुचाकीचा चुराडा झाला.
या मजुराने तात्काळ अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही तरुणांना तात्काळ रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषीत केले.
या अपघातात मृत्यू झालेले दोन तरुण एकाच घरातील असून ते चुलत भाऊ होते आणि तिसरा त्यांचा मित्र होता. तिघेही तरुण उदयनगरचे रहिवासी होते. अमडापूर पोलिसांनकडून अज्ञात वाहनाचा कसून शोध घेतला जात आहे.

Previous articleआडवीहीर फाट्याजवळ अपघात., दोन जण ठार
Next articleरंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई महाराष्ट्र आयोजित Handwditing and Colouring स्पर्धेत सुजाता स्कुल च्या विद्यार्थांचे यश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here