Home उतर महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात मोठ्या बदलाची आवश्यकता – अनंत पाटील (

शिक्षण क्षेत्रात मोठ्या बदलाची आवश्यकता – अनंत पाटील (

23
0

आशाताई बच्छाव

1001048572.jpg

शिक्षण क्षेत्रात मोठ्या बदलाची आवश्यकता – अनंत पाटील श्रीरामपूर प्रतिनिधी दिपक कदम 
मानवी विकासासाठी शिक्षण हे एक मुख्य साधन असून, त्यामुळेच आज शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत दै. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी डिपॉल इंग्लीश मिडीयम हायस्कूलच्या २७ व्या वार्षीक स्नेह संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, डिजिटल व इंटरनेट तंत्रज्ञान व माहिती भांडार यासाठी फार उपयुक्त आहे. अर्थात, ते केवळ तंत्र म्हणून न स्वीकारता, त्याचा योग्य पद्धतीने वापर करायला हवा ज्या गोष्ट्री आपण फक्त सिनेमे किंवा गोष्टींमध्ये ऐकल्या आणि बघीतल्या त्या आता प्रत्यक्षात घडत आहेत. यावेळी त्यांनी सोशल मिडीयाचे दुष्परीनाम ही समजावत कार्यक्रमासाठी सदिच्छा व्यक्त करत उपस्थितांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सिस्टर डॉक्टर बेनिंजा एस. सी. एस. ए .या उपस्थित होत्या त्या सेंट् लुक हॉस्पिटलमध्ये सध्या कार्यरत आहेत. विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ आसिफ जीवनी (मेडिकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालय पुणतांबा ) व कुमारी नेहा ओझा (एअर होस्टेस एअर इंडिया) त्याचप्रमाणे रेव्ह. फादर जीमिल व्ही. सी.( प्रेसिडेंट ऑफ व्ही एम एस एस अहिल्यानगर )यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. विद्यालयाचे व्यवस्थापक रेव्ह. फादर सीजो व रेव्ह फादर फ्रॅंको आणि विद्यालयाच्या प्राचार्य रेव्ह सिस्टर सेलीन ,रवींद्र लोंढे यांची कार्यक्रमाला अनमोल असे मार्गदर्शन लाभले. मुलांनी विविध कला गुणांचे प्रदर्शन केले. देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले. श्रीरामपूर येथील डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल गॅदरिंग या कार्यक्रमांमध्ये रतन टाटा यांची एक थीम घेऊ श्रद्धांजली देण्यात आली (छायाचित्रकार अमोल कदम)

Previous articleमाझी वंसुधरा अभीयान ५.० ग्रामपंचायत रावणवाडी ची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल
Next articleअडावद पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ. संजय पाटील यांचा रेल्वे अपघातात मृत्यू;
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here