Home भंडारा अड्याळ येथे संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक

अड्याळ येथे संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक

48
0

आशाताई बच्छाव

1001027637.jpg

अड्याळ येथे संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )आज दिनांक 8 डिसेंबर 2024 रोज रविवारला सकाळी 10 वाजता समाजाला माझ्या समाजाला किर्तन व अभंगाच्या माध्यमातून शिकवण देणारे संत जगनाडे महाराज यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त मंडई पेठ येथील संत जगनाडे महाराज समितीच्या वतीने संत जगनाडे महाराजांची पालखी काढण्यात येऊन भव्य मिरवणूक अड्याळ शहरात पारंपारिक पद्धतीने काढण्यात आली .या रॅलीमध्ये पारंपारिक पद्धतीने शेतकरी शेतीत चालवत असलेले नांगर ,पारंपारिक पद्धतीने तेल घाणीचे दृश्य ,ढोल ताशांच्या गजरात, उंटाचे प्रदर्शन, या रॅलीमध्ये मुख्य देखावा होता .या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने तेली समाजाने सहभाग घेतला होता. रॅली यशस्वी करण्याकरता प्रकाश मानापुरे, सुरेश गायधने, रवींद्र कुरंजेकर, भगवान कुरंजेकर ,राजू वंजारी , अमोल उराडे, गोपाल लांबट, शंकर मानापुरे ,जयश्री कुंभलकर, ज्योती कुंभलकर ,महेश कुंभलकर , राहुल खोब्रागडे, अविनाश गभणे,विवेक मोटघरे व असंख्य महिला ,पुरुष रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Previous articleसुजाता कन्या विद्यालय अड्याळ येथे 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा
Next articleशेतकरी हाच शास्त्रज्ञ- नामदेव काशिद तालुका कृषि अधिकारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here