आशाताई बच्छाव
भरधाव ट्रकने चिखला फाट्यावर दुचाकी स्वरांना चिरडले त्यात दोघांचा मृत्यू तर ट्रकचालक फरार….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली तालुक्यातील बिबि जवळील चिखला फाट्यावर सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान ट्रक व दुचाकी मध्ये जबर धडक होऊन या धडकेत मध्ये पिंपरी खंदारे येथील दुचाकी मध्ये जोरदार धडक होऊन धडकेमध्ये दुचाकी वरील दोन जणांचा जाग्यावरच मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे येथील बंडू शिवाजी चौधर, व दत्तात्रय बाळाजी चौधर हे दोघेजण दुचाकी क्रमांक MH28 AQ 5350 ने दोघे हे बिबी वरुन घरी जात असताना मेहकर वरून जालन्याकडे भरधाव ट्रकने जात होता. चिखला फाट्यावर MH 12 TV 2067 या ट्रक ने जोरदार धडक दिली.
या धडकेत पिंपरी खंदारे येथील दोघे दुचाकी स्वार जागीच ठार झाले असून याची माहिती बिबी पोलीस स्टेशनला मिळाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू करुन ट्राफिक सुरळीत केली.
ज्या ट्रकने जबर धडक दिली होती या ट्रकचा चालक हा तिथून फरार झालेला आहे याचा तपास बेबी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहे.