Home वाशिम पांडुरंग जगदीश्वराच्या भूमीत गटार गंगेचं मुख्य रस्त्यावर वाहते घाण पाणी  नागरिकाचे आरोग्य...

पांडुरंग जगदीश्वराच्या भूमीत गटार गंगेचं मुख्य रस्त्यावर वाहते घाण पाणी  नागरिकाचे आरोग्य धोक्यात प्रशासन मात्र सुस्त

376
0

आशाताई बच्छाव

1000790806.jpg

पांडुरंग जगदीश्वराच्या भूमीत गटार गंगेचं मुख्य रस्त्यावर वाहते घाण पाणी  नागरिकाचे आरोग्य धोक्यात प्रशासन मात्र सुस्त
अनसिंग:- वाशिम तालुक्यातील अनसिंग ही सर्वात मोठी बाजारपेठ व सतरा सदस्यीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ह्या संस्थेने प्रभाग क्र.२ मधील पावसाचे व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत नाली (गटार गंगा) बांधली ह्या गटार गंगेच्या सदोष बांधकामामुळे गटार गंगेचे घाण दुर्गंधीयुक्त पाणी भर उन्हाळ्यात ग्रामीण रुग्णालयामध्ये शिरले व नागरिकांच्या व ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचाआरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला येवून गावात असंतोष पसरला.यावेळी वाशिम जि.प‌चे कर्तव्यदक्ष सिईओ वैभव वाघमारे यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देवून रुग्णालयाची पाहणी केली व आँखो देखे हाल पाहून गटार गंगेच्या घाण दुर्गंधीयुक्त पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे फर्मान सोडले यावेळी विद्यमान जि.प.सदस्यासह आजी माजी स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य उपस्थित होते परंतू हम करू सुकायदा ह्या म्हणीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेने कोणताही विचार न करता ह्या पाण्याची कोणतीही व्यवस्था न लावता गटार गंगेची नाली ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्यद्वारामध्ये फोडून ते घाण दुर्गंधीयुक्त पाणी समोरच मुख्य रस्त्यावर सोडले त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्याचे आरोग्य धोक्यात आले आहे तर दुचाकी वाहन चालक तथा पायदळी चालणाऱ्याना तारेवरची कसरत करावी लागत आहे एवढी भयावह स्थिती निर्माण होवूनही भष्टाचाराचे कर्दनकाळ समजले जाणारे जि.प.सदस्य पांडुरंगजी ठाकरे तसेच लोकशाहीचे चौथा आधारस्तंभ म्हणून काम केलेले तथा विद्यमान स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पॅनेलचे सर्वेसर्वो जगदिश राजे दुसऱ्याचा भ्रष्ट अनागोंदी कारभार उजागर करणारे आज मुंग गिळून का असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनागोंदी भ्रष्ट्र कारभाराचा निषेध नोंदवित स्थानिक नागरिकांनी बाजारपेठ बंद ठेवून मनसेचे यश चव्हाण यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शविला व दिल्लीतील राजकारण अनसिंगचे गल्लीत असल्याने येथे खरा खेळ सुरु झाला.व वाशिम जि.प.सिईओ वैभव वाघमारे यांचे पाठोपाठ वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी ग्रामीण रुग्णालयास आकस्मीत भेट देवून रुग्णालयाची पाहणी केली व रूग्णालयात शिरलेले पाणी आणि गटार गंगेच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेचा अनागोंदी भ्रष्ट कारभार उजागर होवू नये म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचा बचाव करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान तथा माजी सदस्य उपस्थित राहून ह्या गटार गंगेच्या पाण्याची विल्हेवाट लावण्या साठी सरसावले व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून अतिक्रमणाचा खोडा दाखविला व रस्त्यावरील गटार गंगेच्या प्रकरणाची दिशा बदलविण्यात आली आणि गटार गंगेचे घाण दुर्गंधीयुक्त पाणी ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारामधून मुख्य रस्त्यावर बिनधोकपणे सोडण्यात आले ते आजमितीला वाहत असल्याने वाशिम जिल्हाधिकारी व सिईओ वाशिम यांचे आदेशाला केराची टोपली दाखवली की काय असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे श्री. शृंगॠषी महाराजांचे पावण भुमीत गटार गंगेचे पाणी मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने पांडुरंग जगदीश्वराच्या भूमीत गटार गंगेचं मुख्य रस्त्यावर वाहते घाण दुर्गंधीयुक्त पाणी हे विठ्ठला आता तूच बघ असे म्हणण्याची वेळ आली आहे.कारण ह्याच गटार गंगेच्या वाहत्या पाण्या मधून कांहीं विघ्नहर्ता गणरायाला निरोप देण्यात आला एवढी दयनीय अवस्था येथील रस्त्यांची झाली आहे.अनसिंग ह्या श्री.शृंगॠषी महाराजांचे पावन भूमीला श्री.कपिलेश्वर ॠषीचे शिवारामधून प्रवेश करावा लागतो तेथे अनसिंग चौफुलीवर भव्य अशी कमान असून त्याचे वर मनमोहक श्रीकृष्णाची गोमातासह सुबक मूर्ती आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियोजन शून्य कारभारामुळे व निष्क्रीय धोरणामुळे भररस्त्यात कुठलाही परवाना अथवा अन्नसुरक्षा अन्न भेसळ मानांकन नसताना बिनधास्तपणे उघड्यावर मांस विक्री केली जाते त्या प्रती स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत रोष व्यक्त केला जात आहे तरी संबंधित विभागाने त्वरीत उपाययोजना करून नागरिकांचे आरोग्य तथा मुलभूत गरजा अबाधित ठेवून मुख्य रस्ते , नाल्या, पथदिवे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छता,अशा ना अनेक समस्या सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी स्थानिक सुज्ञ नागरिकांनी मागणी केली आहे.
कोट:-
मुख्य रस्त्यावर सोडलेल्या गटार गंगेच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहे रस्त्यावर खड्डे असतील किंवा पाणी साचून राहत असेल तर पावसाचे पाण्यात खंड पडला की तेथे क्रॉक्रीट अथवा डांबरीकरण करण्यात येईल
श्री.धिरज गणवीर
सां.बां.शाखाभियंता वाशिम.

) रस्त्यावर वाहत असलेले पाणी पावसाळा सुरू असल्याने सध्या बंद करता येणार नाही पाऊस थांबला अथवा उघाड पडल्यावर ते पाणी बंद करण्यात येईल.
सचिव
श्री.श्याम बरेटीया
ग्रा.प.अनसिंग

भूमिगत गटार योजना अंतर्गत बनवलेल्या नाली मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून त्या भ्रष्टाचाराला कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न करण्याचे काम चालू असल्याचे दिसून येत आहे. तर नालीच्या पाण्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना व तिथून ये जा करणाऱ्या नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. त्या रस्त्याचे आजूबाजूला असलेल्या दुकानदाराना नाली च्या घाण पाण्यामुळे आजाराचा सामना करावा लागत आहे
श्री.विठ्ठल माणिक सातव सामाजिक कार्यकर्ते अनसिंग .

Previous articleकोथुर्णा येथील आबादी भूखंडातून जाणाऱ्या नागपूर भंडारा गोंदिया द्रुतगती महामार्गासाठी
Next articleअलिबाग मांडवा जेट्टी जवळ आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here