Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूरला पावसाळी शुटींग बॉल स्पर्धा संपन्न

श्रीरामपूरला पावसाळी शुटींग बॉल स्पर्धा संपन्न

15
0

आशाताई बच्छाव

1000765734.jpg

श्रीरामपूर , दिपक कदम तालुका प्रतिनिधी –दिनांक 2019124 रोजी डिपॉल शाळेच्या प्रागणात क्रिडा व युवकसेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय अहमदनगर आणि तालुका क्रिडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहमदनगर जिल्हास्तरीय पावसाळी शुटींग बॉल स्पर्धा २०२४-२५ चा उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला . डिपॉल शाळेचे व्यवस्थापक फादर फँको फादर शीजो प्राचार्या सिस्टर सेलीन यांनी मान्यवरांचे शॉल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी जेष्ठ क्रिडा मार्गदर्शक बाळासाहेब कण्हेरकर सर हे अध्यक्ष तर तालुका क्रिडा प्रमुख कोहकडे सर उपाध्यक्ष म्हणून लाभले . तर संघटनेचे सेक्रेटरी राजेंद्र पुजारी सर हे प्रमुख पाहुणे होते कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. सोनाली झांजरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ नीता वराळे यांनी केले या उद्घाटन प्रसंगी इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांनी मॉली कुथुर यांच्या मार्गदर्शना खाली रिंगडांस व पॅराशुट डांस सादर केले कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी गणेश सर दिपक कदम सुनील बोर्गे बीना कदम यांनी विशेष मेहनत घेतली तर डिपॉल शाळेचे क्रिडा शिक्षक संदिप निबे सर व रविंद्र लोंढे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले इयत्ता सातवी व आठवी च्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव
Next articleआमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते ग्रामपंचायत आष्टी व अनखोडा येथील 1. कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here