Home नागपूर नागपूर येथील अध्यापक भवन येथे संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ समितीची सभा संपन्न

नागपूर येथील अध्यापक भवन येथे संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ समितीची सभा संपन्न

100
0

आशाताई बच्छाव

1000749945.jpg

नागपूर येथील अध्यापक भवन येथे संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ समितीची सभा संपन्न

नागपूर (संजीव भांबोरे )आज दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी नागपूर येथील शेतकरी भवनांच्या बाजूला असलेल्या अध्यापक भवनांमध्ये संयुक्त रिपब्लिकन आघाडी नागपूर आणि एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा यांच्या वतीने एका सभेचे आयोजन करण्यात आलेले होते .या सभेचे अध्यक्षस्थानी आयुष्यमान दुर्वास चौधरी होते .आणि या सभेमध्ये रिपब्लिकन नेते जे गटबाजीत विभागले गेलेले आहेत या सर्व रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आणि आंबेडकरी समुदायातल्या ज्या विविध संघटना कार्यरत आहेत त्या सर्व संघटनांना एकत्र आणणे हा उद्देश ठेवून समाजाला एक एकत्रितपणे संघटन उभे करण्याचा विचार या माध्यमातून करण्यात आला .आणि समाजाचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व प्रभावीपणे उभं झालं पाहिजे हा विषय घेऊन ही सभा आयोजित करण्यात आली .
त्यांशिवायही समाज किती महत्त्वाचा आहे हे गृहीत धरून नेत्यांशिवाय समाज या संकल्पनेला पुढे आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. या सभेमध्ये संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ असे नाव देण्यात आले . ज्या दोन समित्या कार्यरत असणाऱ्या भंडारा आणि नागपूर मधल्या या दोन्ही समित्या एकत्र येऊन संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ असे नामकरण करण्यात आले .आणि येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे कोणी इच्छुक उमेदवार असतील या उमेदवारांची चाचपणी करण्यात येईल आणि या संघटनेची बांधणी एकसूत्र पद्धतीने करण्याचा विचार या सभेमध्ये व्यक्त करण्यात आला. उत्तर नागपूर आणि भंडारा या दोन विधानसभा क्षेत्रामध्ये दोन उमेदवार देण्याचा विचार करण्यात आला .आणि जे कोणी उमेदवार विदर्भामध्ये वेगवेगळ्या मतदार संघामध्ये इच्छुक असतील त्यांची चाचणी करण्यात येऊन कोर कमिटीच्या समोर त्यांचे अर्ज घेऊन त्यावर मग ही संघटना विचार करेल. विविध
आंबेडकरी संघटना समाजाचं कुटुंब आहे या विभक्त झालेल्या आंबेडकरी समुदायाला या संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी हा एक नवा प्रयोग करण्याचा उद्देश या संघटनेने केलेला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी समाज कल्याण सभापती
चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले.‌कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश खोब्रागडे यांनी केले .आभार कैलास बोंबडे
यांनी मानले. सभेला अमृत बनसोड ,,रोशन जी जांभुळकर ,चंद्रशेखर टेंभुर्ण दिलीप वानखेडे, संजीव भांबोरे ,
रामटेके राजेश मडामे ,प्राध्यापक प्रदीप बोरकर ,सहदेव गोडबोले ,ओमप्रकाश सोनकुसरे ,दिनेश डोके, सुनील इलमकर ,दिलीप लांडगे ,दिनेश गोडघाटे, दुर्वास चौधरी, रेश्मा भोयर ,पद्माकर गणवीर, कैलास बोंबाडे ,गीता कवाडे ,मनीष गाणार ,हिरालाल मेश्राम, आणि मोठ्या संख्येने कार्यकर्तागं उपस्थित होते .

Previous articleनिरोगी आणि सशक्त भारतासाठी मूल्यशिक्षण आवश्यक – दादी रतनमोहिनी
Next articleपरळीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शिक्षकानेच केला विनयभंग!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here