Home बुलढाणा उद्यापासून जिल्हा परिषद कर्मचारी जाणार बेमुदत संपावर.

उद्यापासून जिल्हा परिषद कर्मचारी जाणार बेमुदत संपावर.

37
0

आशाताई बच्छाव

1000690090.jpg

उद्यापासून जिल्हा परिषद कर्मचारी जाणार बेमुदत संपावर.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- बुलडाणा उद्यापासून जिल्हा परिषद कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र युनियन जिल्हा शाखा बुलढाणा यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पुर्वी जाहिरात / अधिसूचना केलेल्या पदावरील नियुक्त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम निवृत्ती वेतन नियम १९८२ अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय पारीत झाला. मात्र, परिषद कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांचा कालावधी होऊन देखील ग्रामविकास विभागाने निर्णय जारी केलेले नाही तो त्वरीत जारी करण्यात यावा.
समन्वय समितीच्या सुकाणु समितीबरोबर झलेल्या चर्चेनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम १९८२ नुसार मुख्यमंत्री यांनी सुधारीत जुनी निवृत्ती वेतन योजना बाबतीत १ मार्च २०२४ रोजी विधानसभेत केले घोषणेनुसार अधिसुचनेच्या माध्यमातून प्रसारीत करण्यात यावी, निवृत्तीच्या वेळी शेवटच्या पगाराच्या ५० वेतन, त्यावरील महागाई भत्ता, वेतन आयोगाच्या वेळी निवृत्ती वेतनाची पुनर्रचना आदी आर्थिक लाभासह सहकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी.
विविध प्रलंबीत मागण्यांसाठी १९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जि. .प. कर्मचारी युनियन जिल्हा शाखा बुलढाणा यांच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here