Home जालना धारकल्याण येथील दीपक राज बारमध्ये चोरी करणारा परभणी येथील सराईत आरोपी जेरबंद...

धारकल्याण येथील दीपक राज बारमध्ये चोरी करणारा परभणी येथील सराईत आरोपी जेरबंद करून 60,262 रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त.

32
0

आशाताई बच्छाव

1000677561.jpg

धारकल्याण येथील दीपक राज बारमध्ये चोरी करणारा परभणी येथील सराईत आरोपी जेरबंद करून 60,262 रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 25/08/2024
याविषयी सविस्तर वृत्त असे की,दिनांक 16/ 8 /2024 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास सिंदखेड राजा ते जालना रोडवरील धारकल्याण येथील हॉटेल दीपक राज बारमध्ये चोरी करून दारूच्या विविध कंपनीच्या बाटल्या चोरी झाल्या बाबत फिर्यादी नामे सुंदर दिनकर इंगोले राहणार धारकल्याण जालना यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन तालुका जालना येथे गुरंन 526 /2024 कलम 305 (A)334(1)भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक नि शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदस्य गुन्हा उघडकीस आनंदी बाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 24 8 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा आरोपी शेरसिंग सुजित सिंग भोंड वय 22 वर्ष राहणार जिल्हा परिषद जवळ अण्णाभाऊ साठे नगर जिल्हा परभणी यांनी व त्याचे साथीदार यांनी केला असल्याची माहिती मिळाली त्यावरून शेर सिंग सुजित सिंग भोंड या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून रुपये 60, 265 किमतीच्या विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
सदरची कारवाई मां. पोलिस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव ,सपोनी श्री योगेश उबाळे, सपोनी श्री शांतीलाल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सोबत पोलीस अमलदार शाम्युल कांबळे, कृष्णा तंगे ,रामप्रसाद बहुरे, सुधीर वाघमारे, कैलास खाडे ,भाऊराव गायके, लक्ष्मीकांत आडेप, जगदीश बावणे, रुस्तम जैवळ, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले ,सौरभ मुळे सर्व स्थागुशा.जालना यांनी केली आहे.

Previous articleजालना जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने विहीरींच्या पाणीपातळीत वाढ
Next articleविद्यार्थिनींनी राख्या व संदेश पत्र पाठवून व्यक्त केल्या सैनिकांप्रति कृतज्ञता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here