Home विदर्भ वसमतच्या जि. प. प्रशालेत अस्वच्छ पिण्याचे पाणी टाकीत आळ्या झाल्याचे विदयार्थ्याचे मत

वसमतच्या जि. प. प्रशालेत अस्वच्छ पिण्याचे पाणी टाकीत आळ्या झाल्याचे विदयार्थ्याचे मत

39
0

आशाताई बच्छाव

1000677430.jpg

वसमतच्या जि. प. प्रशालेत अस्वच्छ पिण्याचे पाणी टाकीत आळ्या झाल्याचे विदयार्थ्याचे मत.                 हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ 

जि. प. प्रशाला वसमतच्या ठिसाळ कारभार गरीब अल्पसंख्यांक , मागसवर्गीय मोल मजुरी करूण जगणाऱ्या वर्गाचे विदयार्थी या शाळेत शिकतात या विदयार्थाच्या पालकांना माहीत ही नसते आपले लेकरं कोणत्या शाळेत टाकायचे यांनी काही वसमत च्या संस्थेच्या शाळेशी अलिखीत करार करूण येथील गरीब पालकांच्या परिस्थीतीचे भांडवल करूण यांचे पद वाचवीण्यासाठी परस्पर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतात अशी चर्चा शाळे संबधीत असलेल्या कर्मचारी नागरीक करताना ऐकण्यात येत आहे.
असे गरीब विदयार्थ्या कडे दुर्लक्ष करूण शाळेला रंग रंगोटी करूण सि सी टि ०ही कॅमेरे बसनुन चोपडी फरशी आली आहेत पण विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाणी कडे दुर्लक्ष यांना गरीबाच्या लेकरांना चांगले शुद्ध पाणी लागते याचे भान नाही . पाण्याच्या टाकी किती दिवसा पासुन स्वच्छ केली नाही हा संशोधनाचा विषय आहे. पाण्याच्या टाकीत आळ्या झाल्यात तेच आम्हाला प्यावं लागत असा शाळेत शिकणाऱ्या अल्पसंख्याक गरीब विद्यार्थ्यांचे म्हणने आहे. कधी टाकीत पाणी नसते जेवण केल्यावर पाणी पियाला भेटत नाही . विकत पाणी बॉटल घेण्याची यांची ऐपत नसते . शिक्षक व कर्मचारी स्वःता ला पाणी पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा जार मागवतात. विदयार्थ्यानी शुध्द पाणी पिऊ नये का ❓ अशा अशुध्द ,अस्वच्छ टाकीतले पाणी पिऊण गरीबांचे शाळेतील विदयार्थ्याना विविध पोटाचे गंभीर आजार झाले तर याला जवाबदार कोण ❓ यांच्या परिवाराने मोलमजुरी करूण जगवावे की दवाखाना करावा ❓देशाला तंदरूस्त पिढीची गरज आहे. अस्वच्छ पाणी पाजवुन भावी पिढीला आरोग्य विषयक समस्येने ग्रासण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे . लोकप्रतिनिधी , कार्यकर्ते भेटी घाटीत व्यस्त आहेत त्यांनी जि. प. प्रशाला वसमत मधील विदयार्थाना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसेल तर फार गंभीर बाब आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्या नी या कडे लक्ष देणे आवश्यक आहे . सदरील शाळा दोन सत्रात चालते शाळेची भव्य दोन मजली इमारत आहे दोन्ही मराठी व उर्दू माध्यम एकाच सत्रात चालवुन पूर्ण वेळ सक्षम उच्चश्रेणी मुख्याध्यापक देऊण गरीबांच्या लेकरांना पूर्ण शैक्षणिक सुविधा पुरवाव्यात. मागील आठ वर्षा पासुन प्रभारी पद घेऊण कोणीच पद घेण्यास तयार नाही काही ने तसे लिहूण दिले असे कारण दाखवत शिक्षण विभाग सक्षम पूर्णवेळ मुख्याध्यापक पद भरत नसल्याने गरीबांच्या मुला ,मुलींचे शैक्षणीक नुकसान करत आहे. जवाबदारी नाकारणाऱ्या शिक्षकांची बदली करूण नियमा प्रमाणे सक्षम जवाबदार उच्चश्रेणी मुख्याध्यापक दिला तर विदयार्थ्याचे शैक्षनीक विकास होऊन त्यांना न्याय मिळेल
दिखावु पणा करूण विद्यार्थ्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू न शकणाऱ्या प्रभारी इनचार्ज च्या अर्थीक व्यवहाराची चौकशी करूण कार्यवाही करावी अशी मागणी़ पालक व विदयार्थी करत आहेत.

Previous articleवसमत शहरातील दुकानदार व दुचाकी स्वार यांना नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार .
Next articleअंतराळ दिन एक संस्मरणीय अनुभव – प्राचार्य भारत भूषण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here