Home उतर महाराष्ट्र केवायसीची पैसे काढण्यात आडकाठी सोनईतील सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी : बँकांमधील कामे...

केवायसीची पैसे काढण्यात आडकाठी सोनईतील सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी : बँकांमधील कामे ठप्प

35
0

आशाताई बच्छाव

1000654074.jpg

केवायसीची पैसे काढण्यात आडकाठी
सोनईतील सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी : बँकांमधील कामे ठप्प
सोनई,(कारभारी गव्हाणे)ता. १७ : महायुती सरकारच्या माध्यमातून नव्याने हाती घेण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेंतर्गत तीन हजार रुपये वर्ग झाल्याचा संदेश मोबाईलवर आला. त्यामुळे आज बँकेत महिलांची तोबा गर्दी झाली. रक्कम जमा झाली. मात्र, केवायसी नसल्याने लाडक्या बहिणींना दोन ते तीन तास ताटकळत बसावे लागते. गावातील सेतू व ग्राहक सेवा कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीमुळे बँकांमधील कामे ठप्प झाली होती.
बँक उघडताच व्यापारी, व्यावसायिक व इतरांची गर्दी असताना सकाळी अकरानंतर लाडक्या बहिणींची बँकेचे प्रांगणात गर्दीच, गर्दी पाहण्यास मिळाली. दुपारी दोन वाजता महिलांची पैसे काढण्यासाठी, तर पैसे जमा झाले का है
पाहण्यासाठी पुरुषांची गर्दी झालेली होती. पैसे आत्याने सर्वांचच चेहरे खुलले आहेत. महाराष्ट्र बँकेतून आज शंभर महिलांनी
आपली तीन हजार रुपये रक्कम काढून नेली अथवा जमा झात्याची खात्री करून गेल्या, तर १५० महिलांनी केवायसीकरिता अर्ज व आधारकार्ड जमा केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र बँकेतील रवी बेल्हेकर यांनी दिली.
स्टेट बँकेत ८० ते ९० महिलांनी रक्कम काढून नेली, तर अंदाजे चारशे महिलांनी केवायसीकरिता आधारकार्ड दिले आहेत, असे व्यवस्थापक ओंकार पोटे यांनी सांगितले. आज दिवसभर ग्राहक सेवा केंद्रात रकमेची खात्री करण्यासाठी रांगा लागल्या होत्या, असे चालक नीलेश मोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here