Home उतर महाराष्ट्र ऑलम्पिकमध्ये भारतीय पदक विजेत्या खेळाडूंचे खडूच्या साह्याने चित्र साकारून चित्रकार गायकवाड यांनी...

ऑलम्पिकमध्ये भारतीय पदक विजेत्या खेळाडूंचे खडूच्या साह्याने चित्र साकारून चित्रकार गायकवाड यांनी केला त्यांचा गुणगौरव.

32
0

आशाताई बच्छाव

1000651594.jpg

ऑलम्पिकमध्ये भारतीय पदक विजेत्या खेळाडूंचे खडूच्या साह्याने चित्र साकारून चित्रकार गायकवाड यांनी केला त्यांचा गुणगौरव.

कोपरगाव,(दिपक कदम).: नुकत्याच पॅरिस येथे ऑलिंपिक स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत १ रोप्य ५ कास्य पदक पटकावली. यामध्ये नीरज चोप्राने भालाफेक मध्ये रोप्य , तर मनु भाकर, सरबजीत सिंग, स्वप्नील कुसळे,अमन शेरावत तर भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले.हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग सह वरील पाच खेळाडूंचे खडू चित्र श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे चित्रकार श्री मंगेश गायकवाड पाटील यांनी रेखाटले.७८ व्या स्वातंत्र्यदिनी पदक विजेत्या खेळाडूंचे रेखाटलेले चित्र कोपरगाव मध्ये प्रमुख आकर्षण ठरले. प्रत्येक जण या पदक विजेत्या खेळाडूंचे रेखाटलेल्या चित्राबरोबर सेल्फी व फोटो घेऊ लागला.माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले की पदक विजेते सर्व खेळाडू ग्रामीण भागातले असून युवा विद्यार्थ्यांनी या खेळाकडून प्रेरणा घेऊन मैदानावर मेहनत करून आपल्या राज्याचे व देशाचे नाव उज्वल करावे, जेणेकरून आगामी काळामध्ये आपल्यापैकीही कोणी विद्यार्थी राज्याकडून व देशाकडून खेळताना पदक जिंकेल व मला त्यांचा फोटो काढण्याची संधी मिळेल. पदक विजेते खेळाडू म्हणजे भारताचा गौरव आहे व या खेळाडूंचा छोटासा गौरव मी माझ्या चित्राच्या माध्यमातून करत आहे असे ते पुढे म्हणाले. सुंदर असे रेखाटलेले चित्रांचे कौतुक शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे, उप प्राचार्या शुभांगी अमृतकर,सर्व सुपरवायझर प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे,नैथिलीन फर्नांडिस व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

Previous articleदिव्यांगांना लायसन्स साठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल-परिवहन अधिकारी अनंता जोशी
Next articleअखेर शिलोडा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना दिले निवेदन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here