Home जळगाव चाळीसगाव मधील सकल हिंदू समाजाच्या निवेदनानंतर बबडी शेखवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा...

चाळीसगाव मधील सकल हिंदू समाजाच्या निवेदनानंतर बबडी शेखवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

111

आशाताई बच्छाव

1000559267.jpg

चाळीसगाव मधील सकल हिंदू समाजाच्या निवेदनानंतर बबडी शेखवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील– दोन दिवसांपूर्वी चाळीसगाव शहरात राहणाऱ्या अमीर निसार शेख उर्फ बबडी शेख या व्यक्तीने “चाळीसगांव कर” या फेसबुक अकाउंट च्या पोस्ट वर हिंदू माता भगिनींच्या बाबतीत लैंगिक शेरेबाजी केली होती
तसेच त्याने हिंदू धर्मियांच्या तीर्थयात्रांबाबत देखील बदनामीकारक कमेंट केल्याने चाळीसगाव तालुक्यातील हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या होत्या. काल सोशल मिडीयावर याबाबत माहिती पसरताच पोलिसांनी बबडी शेख याला ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले होते.
त्यामुळे हिंदू समाजात तीव्र संतापाची लाट पसरल्याने दि 18 रोजी सकल हिंदू समाजाने बबडी शेख याला अटक करावी या मागणीसाठी चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना निवेदन दिले.
यावेळी भारतीय जनता पक्षासह वारकरी संप्रदाय, हिंदुत्ववादी संघटना आदींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकल हिंदू समाजाच्या दबावानंतर बबडी शेखवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भारत न्याय संहिता २०२३ च्या कलम १९६ (१)(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.