आशाताई बच्छाव
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य गजापूर येथे झालेल्या दंगलीचा जाहीर निषेध…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
कोल्हापूर :- बुलढाणा दिनांक १५ जुलै २०२४ काल विशाळगड येथील पायथ्याशी असलेल्या गजापुर मधील मुसलमानवाडी वर झालेल्या हल्ल्याच्या तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य कोल्हापूर कडून जाहीर निषेध करण्यात आला.कोल्हापूर जिल्हा मध्ये असलेल्या शिवकालीन गडावर होत असलेला अतिक्रमणे हटविण्यात ह्या विषयावर अनेक दिवस आंदोलन होत होती.
काही अतिक्रमण प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत पण नव्याने होत असलेली अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी ही शासनाची होती ह्या बद्दल आंदोलने होत असताना सुद्धा शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नाही. तेंव्हा गडकोट संवर्धन होणे साठी छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या स्वराज्य ह्या संघटनेचे वतीने संभाजी महाराज यांच्या वतीने १४ जुलै इ रोजी”चलो विशाळगड” अशी घोषणा देण्यात आली होती.
ह्या घोषणेमुळे दिनांक १३ जुलै पासुन पुणे व सांगली येथील तरुण जमण्यास सुरुवात झाली होती. पोलिस प्रशासनाने देखील तयारी ठेवली असताना. विशालगडावर असण्यार्या “मलीक रेहान बाबा ” दर्गा वर दिनांक १४ जुलैला सकाळी नऊ वाजता दगडफेक करण्यात आली. तेथील जमावास पोलिस प्रशासनाने तरुणांना अटकाव करुन गडाच्या वरुन खाली जाण्यासाठी भाग पाडले
त्यानंतर खाली आलेल्या व गडाच्या पायथ्याशी जमलेल्या जमावाने गजापुरमध्ये असलेल्या मुसलमानवाडी वर मोर्चा वळवला व तेथील मुस्लिम समाजाला लक्ष करत असताना घरांना आग लावली.अनेक गाड्या उलथापालथ करून घरावर दगडफेक केली. ह्यात घरातील भांडी कुंडीची नासधूस करण्यात आली. मोल्यवान वस्तूची तोडफोड करण्यात आली.
त्याचवेळी तेथील मस्जिदवर ही हल्ला करणेत आला. मस्जीद मधील वस्तूची नासधूस केली. मस्जीद वरील मनोर्यावर हातोड्याने घाव घालण्यात आला.
जेथे मौलवी उभा राहुन आजान दिली जाते तेथे जमावातील तरुणांनी लघुशंका करणेचे घृणास्पद कृत्य केले.
दुपारी दोन वाजता संभाजी राजे तेथे आले ह्यावेळी तेथे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक ह्यांनी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे शी फोनवर बोलुन आंदोलन स्थगित केलेची घोषणा केली.व जमाव माघारी फिरला.
जर प्रशासनाने अगोदर १४ जुलै च्या अगोदर चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता.
ढीसाळ प्रशासना, उदासीन सरकार, शिवविचार हीन असलेले स्वयंघोषित शिवभक्त ह्यांनी पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यातील अलिकडील काळात जो हैदोस घातला आहे त्याचा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य कोल्हापूर ह्यांचे वतीने निषेध करण्यात येत असल्याचे संघटनेचे सल्लागार अरुण कदम, जिल्हा अध्यक्ष संतोष बिसूरे, शहर अध्यक्ष कमलाकर सारंग, करविर तालुका अध्यक्ष विजय लोंढे, ह्यांनी सांगितले.
ह्यावेळी साईनाथ खातेदार, संतोष जोगदंडे, अनिल शेरखाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.