Home अमरावती खासदारांच्या जनसंपर्क कार्यालय भोवती पोलीस पहारा: महिला काँग्रेसचे आंदोलन, प्रशासनाने पुन्हा सील...

खासदारांच्या जनसंपर्क कार्यालय भोवती पोलीस पहारा: महिला काँग्रेसचे आंदोलन, प्रशासनाने पुन्हा सील लावले

111

आशाताई बच्छाव

1000493665.jpg

खासदारांच्या जनसंपर्क कार्यालय भोवती पोलीस पहारा: महिला काँग्रेसचे आंदोलन, प्रशासनाने पुन्हा सील लावले
दैनिक युवा मराठा.

पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयाचा कुलूप सुरू दादा घेण्याला २४ तास उलटत नाही, तोच पुन्हा प्रशासनाने ते कार्यालय “सील “केले असून त्या भोवती पोलिसांचा खडा पहारा उभा केला आहे
तर दुसरीकडे सील केलेले कार्यालय त्वरित खासदारांच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी महिला काँग्रेसने आज, सोमवारी जिल्हाधिकारी यांना साकळे घातले आहे. खासदारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शासकीय जलसंपर्क कार्यालय आहे. आनंदराव अडसूळ हे खासदार असताना त्यांनी आपल्या विकास निधीतून या कार्यालयाचे बांधकाम केले होते. त्यासाठीची जागा मात्र जिल्हा प्रशासनाने पुरविली होती. तेव्हापासून हे कार्यालय त्या ठिकाणी उभे आहे. गेली पाच वर्षे हे कार्यालयात तत्कालीन खासदार नवनीत राणा यांच्या ताब्यात होते. परंतु चावी पुरवायला विलंब केल्याने ४ते१२ जून दरम्यान दोनदा पत्र दिल्यानंतरही त्या कार्यालयाचा ताबा नवे खासदार बळवंतराव वानखडे यांना मिळाला नाही. त्यानंतर १९ राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी पत्र देऊन या कार्यालयाची मागणी केली. नेमक्या याच दिवशी नवनीत राणा यांनी त्या कार्यालयाचा ताबा सोडला. परंतु तोपर्यंत त्या कार्यालयाच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे दोन खासदारांची पत्र प्राप्त झाली होती. परिणामी जिल्हा प्रशासना समोर पेच निर्माण झाला. त्यामुळे १९ जूनला नवनीत राणा यांच्या ताब्यातून स्वतःकडे वळते करून घेतलेले कार्यालय त्यांना कोणालाही देता आले नाही. यासंदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी यांचे म्हणणे होते. मात्र त्यांच्या समक्ष २२ जूनला काँग्रेसचे आमदार माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर व खासदार वानखडे यांनी कार्यालय ताब्यात घेतले. पुढे प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून संबंधित विरुद्ध गुन्हा दाखल करून कार्यालय पुन्हा”सील”केले. परंतु ही बाब खासदाराचा अपमान असून ही संपूर्ण कृती माजी खासदार राणा व राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्तक्षेपामुळे होत असल्याचा आरोप काँग्रेसने लावला आहे. त्या विरोधात काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वात आज जिल्हा कचेरीवर निर्देशने करण्यात आले. जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी असलेले कार्यालय कुलूप बंद ठेवणे योग्य नाही, ते आतापर्यंत लोकनियुक्त खासदाराच्या ताब्यात होते. यापुढेही तसेच असावे, असे माझे मत आहे. त्यामुळेच मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तशी मागणी केली. वेळ आल्यास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून मी याविषयी संस्थेची जात मागेन. खासदार बळवंतराव वानखडे अमरावती यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.

Previous articleजुनी पेन्शन संघटनेचा पुन्हा महाएल्गार, कर्मचारी पेन्शनसाठी आक्रमक पवित्रा घेणार
Next articleआमदार मंगेश चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी म्हणजे महाविकास आघाडीच्या सुनियोजित कटाचा भाग,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.