Home गडचिरोली ९९ कोटी ११ लाख रूपयांच्या निधीतून होणार मार्कंडा देवस्थानाचे जीर्णोद्धार व विकास...

९९ कोटी ११ लाख रूपयांच्या निधीतून होणार मार्कंडा देवस्थानाचे जीर्णोद्धार व विकास कामे

56
0

आशाताई बच्छाव

1000493549.jpg

९९ कोटी ११ लाख रूपयांच्या निधीतून होणार मार्कंडा देवस्थानाचे जीर्णोद्धार व विकास कामे

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश

एमएसआरडीसी कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आता कामाची जबाबदारी आल्याने कामाला गती मिळणार

माननीय मुख्यमंत्री, दोन्हीं उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे मानले आभार।           गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

मार्कंडा देवस्थानाच्या विकासासाठी ९९ कोटी ११ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला असूनb एमएसआरडीसी कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आता कामाची जबाबदारी आल्याने मागील कालावधीपासून थांबलेल्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मार्कंडा देवस्थानाच्या या कामाच्या नियोजनाच्या पाहणीच्या प्रसंगी केली

या देवस्थानाच्या विकासासाठी ९९ कोटी ११ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सांस्कृतिक कार्यमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे जिल्हावासियांच्या वतीने आभार मानले आहे.

मुख्य मंदिराच्या जीर्णोद्धार व संवर्धनाकरिता २० कोटी ८१ लक्ष रुपये, नदीच्या पलीकडे पोहोचण्यासाठी भाविकांसाठी पुलाची निर्मिती २०० मीटर लांब ५ कोटी ५० लाख रुपये, धर्मशाळांचे सुधारणा १ कोटी रुपये, घाट व कपडे बदलण्याच्या जागेसह नदी परिसराचे सुशोभीकरण १५ कोटी ८६ लक्ष रुपये, मूळ पासून ५ मीटर रुंदीचा रस्ता बांधकामासाठी १७ कोटी ५० लाख रुपये ,घाट व कपडे बदलण्याच्या जागेसह नदी परिसराचे सुशोभीकरण १कोटी ८३ लक्ष, माहिती केंद्र (८०० चौरस मीटर) ६ कोटी ५० लाख रुपये अशा प्रकारे मार्कंडा देवस्थानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे .त्याबद्दल आमदार महोदयांनी राज्य सरकारचे आभार मानले असून कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी अशी मागणी केली आहे.

यावेळी उपसरपंच उमाकांत जुनघरे, गजानन भांडेकर, साखरवाडे, बांधकाम विभाग बड्डे, मृत्युजय गायकवाड, पुरातत्व विभाग ar शिवानी शर्मा, जिल्हा सचिव दिलीप चलाख,तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, भाजपा जेष्ठ नेते भाऊजी दहेलकर, युमो उपाध्यक्ष प्रतीक राठी, वसंत चौधरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भोजराज भगत, विशेष दोषी, रामचंद्र वरवाडे, प्रिया म्हस्कोल्हे, सुषमा आत्राम, यांचे सह स्थानीक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleसाकोलीतील अवैध अतिक्रमणे तातडीने हटवा – जनतेचे निवेदन सादर
Next articleजमीन राहिली तर समोरच्या पेरण्या होतील जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी तथा माजी आमदार राहुल बोंद्रे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here