आशाताई बच्छाव
रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रूपये आणले नाही म्हणून विवाहीतेचा छळ
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- रिक्षा घेण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आणले नाही या कारणावरून विवाहीतेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील क्रांतीचौक, सुयश लॉन्सजवळ, चाळीसगाव परीसरातील माहेर असलेल्या 23 वर्षीय तरुणीचा नामपूर ता. बागलान जि.नाशिक येथील अरविंद्र नरेंद्र निकुंभ याचेशी 2018मध्ये झाला. लग्नानंतर काही महिन्यांनी सासरच्या लोकांनी काहीना काही कुरापती काढून विवाहीतेचा छळ केला. सासुसार्यांच्या सांगण्यावरून पती तिरस्कार करीत. पती कामानिमीत्त पुण्यात गेल्यावर तिथेही छळ सुरूच होता.
त्यानंतर रिक्षा घेण्यासाठी माहेरून 2 लाख रूपये आणून दे अन्यथा नांदवणार नाही असे सांगून मारहाण, शिवीगाळ करत शारीरीक व मानसिक छळ सुरूच ठेवला. या छळाला कंटाळून विवाहीतेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
विवाहीतेच्या फिर्यादीवरून पती अरविंद नरेंद्र निकुंभ, सासू शोभा नरेंद्र निकुंभ, सासरे नरेंद्र पोपट निकुंभ, दीर उमाकांत नरंेंद्र निकुंभ सर्व रा. आदर्शनगर, विठ्ठल मंदिर, नामपूर ता. बागलाण जि. नाशिक, नणंद कविता समाधान सोनवणे, नंदोई समाधान सोनवणे दोन्ही रा. नाशिक यांच्या विरोधात भादंवि 498अ, 323,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.