Home नांदेड युवकांनी योग अभ्यास आत्मसात करून योगाचा प्रचार करावा – माजी मुख्यमंत्री तथा...

युवकांनी योग अभ्यास आत्मसात करून योगाचा प्रचार करावा – माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण

45
0

आशाताई बच्छाव

1000478360.jpg

युवकांनी योग अभ्यास आत्मसात करून योगाचा प्रचार करावा – माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड, दिनांक 19: विविध आजारांवर नियंत्रण मिळण्यासाठी आणि निरंतर निरोगी तसेच सुदृढ राहण्यासाठी योग अभ्यास आणि नियमित योगसाधना आवश्यक आहे. तरुणांनी योग अभ्यास आत्मसात करून लोकांमध्ये योगाचा प्रचार करावा , असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड यांच्या विद्यमाने व आर्ट ऑफ लिविंग यांच्या सहकार्याने आज यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातील बहुउद्देशीय क्रीडा संकुल नांदेड येथे मल्टीमीडिया चित्रपट प्रदर्शनाचे उदघाटन खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार ढेमरे, नगर रचना विभागाचे सहायक संचालक पी.एल. आलूरकर, श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटी रजिष्ट्रार संदीप पाटील, रावसाहेब शेंदारकर, नरेंद्र चव्हाण , क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, द आर्ट ऑफ लिविंगचे समन्वयक शिवा बीरकले, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आणि सर्व प्राध्यापक वर्ग तसेच संस्थेचे कर्मचारी-विद्यार्थी आदी मान्यवर होते.

अलीकडच्या काळात जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला असून लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेत, यासाठी नियमित योगाभ्यासासोबत नैसर्गिक जीवनशैली तसेच योग्य आहार घेतला पाहिजे. नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो द्वारे प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे कौतुक खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले. तसेच शहरातील सर्व विद्यार्थी व नागरिकांनी या प्रदर्शनाची पाहणी करून योग अभ्यासाची माहिती घ्यावी असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे देश विदेशात मोठ्या प्रमाणावर योगाचा प्रचार आणि प्रसार होत असून जनता योगाभ्याकडे वळत असल्याचे ते म्हणाले.

हे प्रदर्शन दिनांक 19 ते 21 जून 2024 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत सर्वासाठी खुले आहे, या प्रदर्शनानिमित्त तीन दिवस योग शिबाराचे आयोजन प्रदर्शनस्थळी करण्यात आले आहे. प्रदर्शानिमित पोष्टर स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागरण रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous articleशितल नागदेवे कलारत्न पुरस्काराने सन्मानित
Next articleप्रकल्प बाधितेच्या अडचणी सोडवण्यासाठी माहिती सादर करा: विभागीय आयुक्त डॉ. निधी पांन्डेय यांचे संबंधितांना निर्देश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here