Home पुणे कोजागिरी पौर्णिमेनिमित महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न

कोजागिरी पौर्णिमेनिमित महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न

118
0

आशाताई बच्छाव

IMG-20221011-WA0027.jpg

पुणे,(प्रतिनिधी उमेश पाटील)                               कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी रांगोळी व पाक कला स्पर्धा यांचे दापोडी मध्ये आयोजन करण्यात आले सगळ्यांचा राजा मित्रपरिवार यांच्यावतीने दापोडी मध्ये संपन्न झाला यावेळी या स्पर्धेमध्ये 271 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला यावेळी विविध रांगोळी ची उत्कृष्ट असं रांगोळी काढून महिलांनी आपली कला सादर केली तसेच यावेळी पाककला या स्पर्धेमध्ये सुद्धा महिलांचा सहभाग उस्फुर्त असा होता तसेच व्हेज नॉनव्हेज पदार्थ करण्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून आला यावेळी स्पर्धकांसाठी परीक्षक म्हणून बाबा बांद्रे व मनीष काजवे यांनी काम पाहिले यावेळी रांगोळी स्पर्धेमधील प्रथम क्रमांक अंजली शिंदे द्वितीय क्रमांक लीला बोराडे तृतीय क्रमांक गीता पांचाळ चतुर्थ क्रमांक रेशमा केंगार पाचवा क्रमांक संगीता बिलोरे तसेच उत्तेजनार्थ छाया बोराडे नीलम गुप्ता व तसेच पाक कला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नंदा उदमले द्वितीय क्रमांक आशा भोसले तृतीय क्रमांक शैलाबाई भगत चतुर्थ क्रमांक हमिदा शेख पाचवा क्रमांक धनश्री बिराजदार उत्तेजनार्थ पद्मा गणवीर दिपाली अमु यांना संजय नाना काटे व वर्षा शिंदे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन यांना सन्मानित करण्यात यावेळी मीना बोराडे सुलभा काटे सारिका अल्हाट लक्ष्मी शिंदे सुमित्राबाई यादव बालमनी सुतार माझी महिला यावेळी बहुसंख्येने महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील कांदळकर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here