Home अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाचे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप’ सुरु खाजगी रुग्णवाहिका वापराचा मिळणार...

जिल्हा स्त्री रुग्णालयाचे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप’ सुरु खाजगी रुग्णवाहिका वापराचा मिळणार मोबदला सुविधा कार्यान्वित;गरोदर मातांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0071.jpg

जिल्हा स्त्री रुग्णालयाचे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप’ सुरु

खाजगी रुग्णवाहिका वापराचा मिळणार मोबदला

सुविधा कार्यान्वित;गरोदर मातांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : गरोदर माता व नवजात बालक रुग्णांना रुग्णालयात ने-आण करण्यासाठी रुग्णवाहीका उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हा स्त्री रुग्णालयाव्दारे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप’ सुरु केले आहे. ही सुविधा पूर्णतः कार्यान्वित झाली असून या सुविधेचा गरजू गरोदर मातांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

जिल्ह्यातील गरोदरमातांना प्रसुतीसाठी येण्याकरीता शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास खाजगी वाहन किंवा रुग्णवाहिका वापरता येईल. अशा वाहनाचे भाडे प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे संबधित मातांच्या खात्यात ऑनलाईन अदा केले जाईल. त्याकरीता गरोदर मातांनी ‘बुक माय ई-व्हेईकल; या ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल यांनी दिली.

प्रसुती व प्रसुती पश्चात 42 दिवसपर्यंतच्या गरोदर माता व एक वर्षापर्यंतच्या नवजात बालकांना तातडीच्या उपचाराकरीता शासकीय व खाजगी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मातांना ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप’ डाऊनलोड करुन नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या मातेने खाजगी वाहन किंवा रुग्णवाहिकेचा वापर केला असेल‍ अशा मातांनी वा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात पोहोचल्यानंतर बँकेचे पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स प्रत जिल्हा स्त्री रुग्णालयात जमा करावी. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे वाहन भाडे ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येईल. शासकीय रुग्णवाहिकेचा वापर झाल्यास लाभ मिळणार नाही.

प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेले दर याप्रमाणे : मारूती व्हॅनचे महानगर पालिका क्षेत्रातील दर पाचशे रुपये प्रती एक फेरी 25 कि.मी. पर्यंत, महानगर पालिका क्षेत्र सोडून 1 हजार रुपये व जिल्ह्याबाहेर 11 रुपये प्रति कि.मी. प्रमाणे राहिल. टाटा सुमो व मॅटॅडोरचे महानगर पालिका क्षेत्रातील भाडेदर सहाशे रुपये प्रती एक फेरी 25 कि.मी. पर्यंत, महानगर पालिका क्षेत्र सोडून 1 हजार 400 रुपये तर जिल्ह्याबाहेर 12 रुपये प्रती कि.मी. प्रमाणे राहिल. टाटा 407 किंवा स्वराज मझदाचे महानगर पालिका क्षेत्रातील भाडेदर सातशे प्रती एक फेरी 25 कि.मी. पर्यंत, महानगरपालिका क्षेत्र सोडून 1 हजार 300 रुपये तर जिल्ह्याबाहेर 13 रूपये प्रती कि.मी. प्रमाणे राहिल. आय.सी.यु. अथवा वातानुकूलीत वाहनाचे महानगरपालिका क्षेत्र सोडून व जिल्ह्याबाहेर वातानुकूलीत यंत्रणा बसविली असल्यास नमूद दरात 15 टक्के वाढ देय राहिल. तसेच 100 कि. मी. च्या वर 15 रुपये प्रती कि.मी. प्रमाणे रक्कम संबंधितांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

Previous articleमल्हार हिल कॅम्पसमध्ये बैल पोळा साजरा
Next articleमा.कॅबिनेट मंत्री डॉ.संजय कुटे यांच्या जळगाव जामोद मतदार संघातील ७० कोटी विकास कामाचा आराखडा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here