आशाताई बच्छाव
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या..
दिनेश आवडके
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
गेल्या दिड-दोन महिन्यांमध्ये झालेल्या सततधार पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडली होती.मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा अतिवृष्टीचा सादर केलेला अहवाल रद्द करून नव्याने शेतकऱ्यांना न्याय देणारा पुन्हा अतिवृष्टी अहवाल सादर करावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली होती.त्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली होती.सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने पिकांची उगवन चांगली झाली होती. माञ मध्यंतरी अनेक दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतातील पिके पिवळी पडली. त्यातच गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामा धोक्यात आला आहे. मुखेड महसूल विभागाने सादर केलेला ६४५ हेक्टर जमीन अतिवृष्टीमुळे सादर केलेला अहवाल अतिशय चूकिचे असून हा अहवाल रद्द करून नव्याने अहवाल सादर करावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन व अधिकाऱ्यांना धारेवर धरू असे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केली जात आहे. अधिकारी पंचनामे करतील शासनाकडून मदत मिळेल अशी आशा शेतकरी लावून धरला आहे. संततधार पावसामुळे मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ७० टक्के पेक्षाही जास्त नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडली आहे.नव्याने न्याय देणारा अतिवृष्टीचा अहवाल सादर करावा अन्यथा शेतकरीसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा काॅग्रेसचे युवा नेते दिनेश शिवराजप्पा आवडके यांनी केला आहे.