आशाताई बच्छाव
घरोघरी तिरंगाः‘महावितरण’ तर्फे पथनाट्य
अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि महावितरणच्या संयुक्त विद्यमाने बस स्थानक परिसरात (दि.१० रोजी)पथनाट्य सादर करण्यात आले.
घरोघरी तिरंगा या अभियानाचा प्रचार तसेच महावितरणच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी मागील काळात अनेक योजना राबविल्या गेल्या.तसेच ऊर्जा क्षेत्रात देशात महावितरणची एक वेगळी ओळख आहे. महावितरणची माहिती या निमित्ताने उपस्थित जनतेला देण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या मुख्य उपस्थितीत महावितरणच्या पथकाने मुख्य बस स्थानक आणि जुना बस स्थानक परिसरात भर पावसात पथनाट्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.महावितरणचे अकोला मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पुरकर यांनी नाटकाची संहिता तयार केली. या पथनाट्यात निलेश बाळापुरे, सचिन खंडारे, किशोर धाबेकर, रोशन समदुरे, रामकृष्ण शेगोकार,भूषण झडपे, सचिन दलाल यांनी सहभाग नोंदवला