राजेंद्र पाटील राऊत
टेंभुर्णी येथील मोफत नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा : निलेश ताटे
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
कन्हेरगांव ● रामरत्न मेडिकल , टेंभुर्णी आयोजित पुणे अंधजन मंडळाचे एच . व्ही . देसाई हॉस्पिटल मोहम्मदवाडी हडपसर पुणे , संचलित मोफत नेत्र तपासणी शिबिर आज सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून या मोफत नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन रामरत्न मेडिकलचे
मा लक निलेश ताटे यांनी केले आहे . या मोफत नेत्र तपासणी I I शुगर तपासणी , पिवळे • रेशन कार्ड धारकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करून दिले जाणार आहे . हे शिबिर रामरत्न मेडिकल बेंबळे चौक , टेंभुर्णी तालुका माढा येथे आज सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत होणार असून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रामरत्न मेडिकलचे मालक निलेश ताटे यांनी केले आहे .