Home उतर महाराष्ट्र शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे महत्वपूर्ण योगदान –...

शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे महत्वपूर्ण योगदान – प्रधान सचिव आय. ए. कुंदन

172

राजेंद्र पाटील राऊत

शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी
महिला व बालविकास विभागाचे महत्वपूर्ण योगदान – प्रधान सचिव आय. ए. कुंदन

नंदुरबार,  (सागर कांदळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची जिल्हा प्रशासनाच्यावतीने नंदुरबार जिल्ह्यात चांगल्याप्रकारे अंमलबजावणी होत असल्याने याचा फायदा जिल्ह्यातील महिलांचे सक्षमीकरण आणि कुपोषणमुक्तीसाठी निश्चितपणे होईल, असे गौरवोद्गार महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी आज मोलगी येथे केले.

प्रधान सचिव श्रीमती कुंदन यांच्यासह एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, युनिसेफच्या आहार विषयतज्ज्ञ राजलक्ष्मी नायर यांच्या पथकाने आज जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्रास भेट दिली, यावेळी त्यांनी महिला व बाल विकास विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांशी प्रधान सचिव आय.ए. कुंदन यांनी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मैनक घोष, मिनल करनवाल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, उपायुक्त गोकुळ देवरे, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य मिशनचे वरिष्ठ सल्लागार डॉ.राजु जोतकर, संजीव जाधव, करण पळसकर युनिसेफचे नितीन वसईकर आदी उपस्थित होते.

श्रीमती. कुंदन पुढे म्हणाल्या की, कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार आणि वेळीच आवश्यक आरोग्य सेवा पुरविणे महत्वाचे आहेत. यासाठी सर्व संबंधित विभाग आपसात समन्वय ठेवून काम करीत असल्याचे नंदूरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. बालकाचा सर्वांगीण विकास करणे, महिलांना सक्षम करणे यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. यासाठी सर्व यंत्रणेने सोबत बैठक घेऊन महिलांना अधिक आर्थिक सक्षम करण्यासाठी नियोजन करावे. बालकांची बाल अदाता नोंदणी वेळेवर करावी. परस्परांशी संवाद साधण्यासाठी व्हॉटॲप गुप तयार करुन संवाद साधावा. यावेळी श्रीमती कुंदन यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षीका यांच्याशी संवाद साधून पोषण ट्रॅकर, ग्राम बालविकास केंद्र, स्थलांतरीत लाभार्थी व त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, तसेच दुर्गम भागात काम करतांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या लवकर सोडविण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
बालआमराई अंगणवाडी केंद्रास भेट…
महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांच्यासह आलेल्या पथकाने सर्वप्रथम बालआमराई येथील अंगणवाडी केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्याशी संवाद साधला. तसेच दैनंदिन कामकाज करताना येणाऱ्या अडचणी व अंगणवाडी केंद्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते गरोदर मातेस बेबी केअर कीटचे तसेच शालेय शैक्षणिक संच वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी गरोदर व स्तनदामातांना अमृत आहार योजनेतून मिळणारा पोषण आहार अंगणवाडी सेविका मार्गदर्शन आदिबाबत मुक्तपणे संवाद साधला यावेळी अंगणवाडी केंद्रावर श्रीमती सारिका दादर, पर्यवेक्षिका यांनी उत्कृष्ट स्तनपान पद्धतीबाबत गरोदर आणि स्तनदा माता यांच्या समोर सादरीकरण केले. क्रॉस क्रेडल पद्धतीचा बालकाच्या पोषण विकासात होणारे फायदे श्रीमती चैताली आव्हाड व वैशाली पाटील यांनी सांगितले. यावेळी सर्व उपस्थितांनी परसबागेस भेट दिली.
काळंबा अंगणवाडी केंद्रास भेट…
महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी त्यानंतर काळंबा, ता.जि. नंदूरबार येथील अंगणवाडी केंद्रास भेट देऊन लाभार्थी महिला यांच्याशी चर्चा केली. व शासनाकडून देण्यात आलेल्या साहित्याची पाहणी केली. यावेळी श्रीमती कुंदन यांनी बाळाचे औक्षण करुन बालकांस भगर व रव्याची खीर दिली. तसेच सहा महिने पूर्ण झालेल्या बालकांना वरचा आहार सुरु करुन मातेला वैविध्यपूर्ण आहार, काळजी व स्वच्छता याबाबत स्तनदा मातांशी संवाद साधला.

सेंट्रल किचनला भेट
श्रीमती.कुंदन यांनी नंदुरबार येथील एकलव्य पब्लिक स्कुल मधील सेंट्रल किचनला भेट दिली. येथून आश्रमशाळेतील मुलांना देण्यात येत असलेल्या आहाराची माहिती जाणून घेतली. आहार बनविण्याची प्रक्रिया तसेच वाटपाची प्रक्रियेचे त्यांनी कौतूक केले.

मोलगी पोषण पुनर्वसन केंद्रास भेट
श्रीमती. कुंदन यांनी आज मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्रास भैट दिली. या ठिकाणी संदर्भित केलेल्या माता व बालकांची भेट देऊन आहाराबाबत व देण्यात येणाऱ्या पोषण सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी श्रीमती. कुंदन यांच्या हस्ते पोषण पुनर्वसन केद्रात उपचार घेतल्याने ज्या बालकांच्या वजनामध्ये श्रेणीवर्धन झाले आशा बालकांच्या मातांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच जास्तीत जास्त प्रमाणात कुपोषित बालकांना शोधून त्यांना संदर्भ सेवा दिलेल्या अंगणवाडी सेविका यांचेही कौतुक केले. तसेच लॉकडाऊनच्या काळात स्वत: बोट चालवून नदी पार करुन बालकांना पोषण आहार पुरविणाऱ्या रेलूताई वसावे यांचाही सत्कार केला. नंदूरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात काम करणाऱ्या सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व संबंधित यंत्रणेच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने मोलगी येथे देवताराज भगरधान्य खरेदी गट व राणीकांजल लोकसंचलित साधन केंद्रामार्फत चालविण्यात येत असलेल्या भगर प्रक्रीया उद्योग केंन्द्रास भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती.खत्री यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, कुपोषण निर्मूलनासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची व इतर महत्वाच्या उपक्रमांची व विषयांची माहिती दिली.
0000

Previous articleविभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकरराव तेलंग यांचा केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार
Next articleगडचिरोली येथील सेमाना देवस्थानात अवघ्या 1 तासात होणारा बालविवाह थांबविला ….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.