राजेंद्र पाटील राऊत
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा अधिकारी अंचल गोयल यांचे आदेश
जिंतूर,(विष्णू डाखुरे तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी गुरुवारी (दि.06) रात्री जारी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत जवाहर नवोदय विद्यालयातील पाच शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नियमितपणे वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी हे आदेश लागू केले आहेत. जिल्हाधिकारी यांनी परभणी जिल्ह्यातील इयत्तापहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा (दि ३१)जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याआदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मनपा आयुक्त, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद त्यांच्यावर सोपवण्यात आली आहेत. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्ती, संस्था, व संघटना यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.