Home विदर्भ गडचिरोली प्रेस क्लब च्या वतीने पञकार दिना निमित्त गौरव पुरस्कार।

गडचिरोली प्रेस क्लब च्या वतीने पञकार दिना निमित्त गौरव पुरस्कार।

270
0

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली प्रेस क्लब च्या वतीने पञकार दिना निमित्त गौरव पुरस्कार।                                                                          गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आमदार डॉ.देवरावजी होळी यांच्या हस्ते नानाजी महाराज वाढई यांचा जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानीत।
गडचिरोली: पञकार दिना निमित्त गडचिरोली प्रेस क्लब च्या वतिने दर वर्षी पञकार दिनी जिल्हा ,समाज व देशाच्या विकासात योगदान देण्यार्या वेक्तीचा जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो दि.०६/०१/२०२२ रोजी पञकार भवन येथे गौरव पुरस्कार सोहळ्या निमित्य नानाजी महाराज वाढई यांना डॉ.देवरावजी होळी आमदार यांच्या हस्ते,शाल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
नानाजी महाराज वाढई यांनी आपले संपुर्ण आयुष्य राष्ट्रसंताच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रसंताच्या विचाराची ज्योत घराघरात नेण्याचे कार्य आज नानाजी वाढई ९१ वर्षीही तेवढ्याच तत्परतेने करत आहेत ते एक वैक्ती नसुन राष्ट्रसंताच्या विचारातुन घडलेली विभुती आहे.त्यांनी केलेले काम खरोखंरच अभिनंदणीय आहे.
तसेच प्रमुख अतिथी म्हणुन डॉ.शीवणाथ कुंभरे,जिल्हा माहीती अधिकारी सचिन अडसुळा,मारोतराव इचोळकर,प्रेस क्लब चे सचिव मिलिद उमरे,डॉ.देवरावजी होळी,व नानाजी महाराज वाढई उपस्थीत होते.
गीतगायण स्पधेतील विजेत्याचा सन्मान करण्यात आले
प्रथम पुरस्कार अरपणा दरडे हिला देण्यात आले , व द्रुतीय पुरस्कार धंनजय गजलवार याला देण्यात आले,श्रावस्ती रामटेके,निलेश वासनीक ,आर्या आखाडे,यांना प्रोत्साहणपञ बक्षीस देण्यात आले.
या शुभ प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सर्व पञकारांना ग्रामगीतेचे वाटप करुन गौरव करण्यात आले.कार्यक्रमाला अनेक पञकार हजर होते,श्री.अरविंद खोब्रागडे,श्री विलास देशमुख,श्री.नंदुभाऊ काथवते,श्री रोहीतदास राऊत,श्री रुपराज वाकोडे,श्री अविनाश भांडेकर,शेमदेव चापले कार्यक्रमाचे संचालन श्री अनिल धामोळे,यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री निलेश पटले यांनी केले.
गुरुदेव भक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here