राजेंद्र पाटील राऊत
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण; कोरोना रुग्णांची संख्या २०००० पार गेली तर राज्यात लॉकडाऊन निश्चित लागणार..?
ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घेण्याचं आवाहनही शिंदे यांनी केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी.”
राज्यातला करोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र दिसत आहे. राज्यातल्या करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. सुप्रिया सुळे, एकनाथ शिंदे, यशोमती ठाकूर यांच्यासह राज्यातल्या अनेक प्रमुख नेत्यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही आता करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.कोरोना रुग्णांची संख्या २०००० पार गेली तर राज्यात लॉकडाऊन निश्चित लागणार असल्याचे सूचक वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
त्यामूळे आता सर्व नगरिकानी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. युवा मराठा वेब न्युज चॅनल तर्फे सर्व नागरिकांना व दर्शकांना आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या,काळजी करू नका असे आवाहन करीत आहोत.