Home नांदेड नायगाव येथील एका युवकास रामतीर्थ पोलिसांनी केली अटक

नायगाव येथील एका युवकास रामतीर्थ पोलिसांनी केली अटक

126
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव येथील एका युवकास रामतीर्थ पोलिसांनीकेली अटक

नांदेड,(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :-

आपल्या चारचाकी वाहनांमधून विनापरवाना बेकायदेशीर पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस बाळगणाऱ्या नायगाव येथील एका युवकास रामतीर्थ पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी दिनांक 31 डिसेंबरच्या पहाटे एकच्या सुमारास करण्यात आली.

नरसी गावात नाईट गस्त ड्युटी असल्याने फौजदार लतीफ शेख रवाना होवून पेट्रोलींग करीत असताना, दि. ३१ डिसेंबर रोजी पहाटे एक वाजता नायगाव रोडवरील ताटे पेट्रोल पंपवरुन सपोनि जाधव यांना फोन आला की, नायगाव येथील संतोष शंकर शिंदे (वय ३५) हा पेट्रोलपंपावर तलवार काढुन गोंधळ घालून, आता स्विप्ट डीझायर गाडी क्र MH-२६ AK-६७२९ या कारमध्ये नरसी चौकाकडे येत आहे. या माहितीवरुन फौजदार लतीफ शेख, सपोनि जाधव व चालक पाहेकों रमेश चत्रु राठोड हे नरसी फाटा चौकामध्ये येऊन थांबले. काही वेळातच तिथे आलेल्या वरील नंबरच्या कारला थांबवून त्यातील इसमाची चौकशी केली. त्याची संपूर्ण चौकशी करण्यात आली असता त्याने संतोष शंकर शिंदे वय ३५ वर्षे व्यवसाय शेती, रा. शिंदे गल्ली, नायगाव अशी ओळख सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीची तपासणी केली असता चालकाचे सीटचे खाली एक गावठी पिस्टल, जिवंत काडतुस व तलवार मिळुन आली.

पोलिसांनी पुढीलप्रमाणे त्याच्याकडून जप्ती केली आहे. १) 25 हजार किमतीची एक सिलव्हर रंगाची गावटी पिस्टल, बट दोन्ही बाजुने काळा रंगाचे कव्हर असलेली जुन्नी वापरती ज्याची मॅगझीनमध्ये चार जिवंत काडतुस २) एक हजाराची एक सिलव्हर रंगाची लोंखडी म्यान, त्यात अंदाजे दीड फुट लांबीची तलवार नक्षीकाम असलेले जुनी वापरती. ३) एक स्विप्ट डिझायर पांढर-या रंगाची कार जिचा क्र.MH-26-AK-6729 अशी असलेली जुनी वापरती. असा एकुण पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील गावठी पिस्टल व तलावर वापरण्याचा पास / परवाना नसताना त्याने बेकायदेशीरपणे हे सर्व जवळ बाळगले. वरील पिस्टल, जिवंत काडतुस, तलवार व कार दोन पंचासमक्ष गुन्ह्याचे पुढील तपासकामी आरोपीकडुन जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार लतीफ शेख करत आहेत.

Previous articleमातेने नवजात बालिकेला स्मशानभूमीत फेकले;माणुसकीला काळीमा फासणारी घटना
Next articleनांदेड जिल्ह्याच्या परंपरेतला शेत महोत्सव “येळवस”…!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here