राजेंद्र पाटील राऊत
🛑 राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी काय आहेत नवीन नियमावली 🛑
✍️ मुंबई : विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज
मुंबई:⭕१२/१२/२०२१ रोजी पासुन मोटार वाहन कायद्यामधील नवीन सुधारणेमुळे वाहन नियमभंगाच्या अपराधाबद्दल आकारण्यात येणा-या दंडाच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
विना खर्चिक आणि सामान्य नियम न पाळणे म्हणजेच वाहन चालविताना ड्रायव्हरसह पुढील सीटवर बसलेल्या व्यक्तीन् सीट बेल्ट न लावणे,सिग्नल मोडणे, सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग रेषेवर वाहन थांबविणे किंवा त्याच्या पुढे वाहन थांबवणे,लेनची शिस्त न पाळणे,वाहन नो पार्किंग जागेत लावणे ,वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे,कर्ण कर्कश्य हॉर्न वाहनास बसविणे,वाहनास दोन्ही बाजुस आरसे नसणे,पोलीसांनी वाहन थांबविण्याचा केलेला इशारा न पाळता निघुन जाणे,वाहन धोकादायक पद्धतीन चालविणेे तसेच वाहन वेग मर्यादे पेक्षा जास्त वेगाने(ओव्हर स्पीड) चालविणे, वाहनाचा विमा न काढणे,विना ड्रायव्हिंग लायसन्स ,विना हेल्मेट,ट्रीपल सीट मोटार सायकल चालविणे लहान अल्पवयीन मुुलांना वाहन चालविण्यास देणे यासारख्या चुकांसाठी ५०० ते १०००, २०००, ५०००/- रुपये व त्यापेक्षा जास्त आर्थिक दंड आकारण्यात येणार आहे.
याबाबत अधिकृत शासकीय आदेशाप्रमाणे ई-चलन मशीनमध्ये बदल करण्यात आले असुन त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र पोलीस दलाने सुरु केली आहे.
त्यामुळे आपण सर्वांनी वाहन चालविताना वरील चुका न करता स्वत: वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करुन तसेच आपली मुले, मित्र,नातेवाईक आणि आपले हितचिंतक यांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी प्रवृत्त करुन आर्थिक नुकसान टाळावे.⭕