पेठ वडगाव येथील कुडाळकर हॉस्पिटल यांच्यावर कायदेशीर कारवाई अद्याप न झाल्यामुळे 15 ऑगस्ट रोजी साखळी उपोषण करणार. = संदीप पाटील नगरसेवक
राहुल शिंदे ब्युरो चीफ कोल्हापूर
पेठ वडगाव येथे कुडाळकर हॉस्पिटल कार्यरत असून या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब कष्टकरी शेतकरी लोक शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी योग्य उपचार मिळावे यासाठी दाखल होतात गरीब रुग्णांना शासकीय योजना देऊन त्यांना योग्य त्या दरात उपचार करण्याऐवजी सदर रुग्णांची पिळवणूक करणे जाणीवपूर्वक त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणे शासकीय निर्णय नियमापेक्षा जास्तीचे शुल्क आकारणे पैसे भरत असताना बनलेल्या सर्व पैशांची बिल पावती न देता कमी पैशाची बिल पावती देणे. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी शिवसेनेचे नगरसेवक यांच्याकडे तक्रार नोंदवली असता त्यावेळेस संदीप पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना तसेच राज्य आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व मुख्याधिकारी वडगाव नगर परिषद वडगाव यांच्याकडे वेळोवेळी तक्रार अर्ज देऊन देखील कुडाळकर हॉस्पिटल यांच्यावर कायदेशीर कारवाई अद्याप न झाल्यामुळे वडगाव शिवसेना वडगाव शहर यांच्यावतीने 15 ऑगस्ट रोजी बेमुदत साखळी उपोषण नगरपालिका चौक येथे करणार आहेत.