वजिरखेडेतील पोल्ट्री फार्म बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा !
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
मालेगांव- नाशिकच्या मालेगांव तालुक्यातील वजिरखेडे गावातील गट नं. ७९ आणि ८८ मध्ये बनविण्यात आलेले पोल्ट्री फाँर्म येत्या ८आँगस्टपर्यत कायमस्वरुपी बंद न केल्यास क्रांतीदिनी ९ आँगस्ट रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा वजिरखेडे ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून वजिरखेडे गावाशेजारील निकम वस्ती व सुकदेव वेडू पाटील नगरातील रहिवाश्यांनी म्हटले आहे की,वजिरखेडे गावाच्या गट नं. ७९ व ८८ मध्ये शशिकांत तिसगे आणि रमाकांत तिसगे यांनी पोल्ट्री व्यवसाय उभारलेला असून, या पोल्ट्री फार्ममुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असून,लहान बालकांना अतिसार,डायरिया कावीळ सारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे,त्याशिवाय सातत्याने घोगावणा-या माशामुळे नागरिकांचे जीवन जगणे नरकयातानेपेक्षा भयानक झालेले आहे.परिसरात या पोल्ट्री व्यवसायामुळे घाणेरडा वास व फैलावणा-या दुर्गधीयुक्त वासामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.तरीदेखील सदरचा पोल्ट्री व्यवसाय हा ग्रामपंचायतच्या संगनमताने व राजकीय वरदहस्तामुळे खुलेआम सुरु असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत.येत्या ८आँगस्ट पर्यत सदरचा पोल्र्ट्री उद्योग कायमस्वरुपी बंद न केल्यास क्रांतीदिनी ९ आँगस्टला निकम वस्तीवरील व सुकदेव वेडू पाटील नगरातील रहिवाश्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.निवेदनाच्या प्रती सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
Home Breaking News वजिरखेडेतील पोल्ट्री फार्म बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा !