राजेंद्र पाटील राऊत
🛑 स्टेजवरच सर्वांसमोर अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका 🛑
✍️ अकोला 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
अकोला :⭕ हिंगणा येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदर अमोल मिटकरी यांना अचानक अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. यानंतर मिटकरी यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असूून सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य कला चित्रपट विभागाच्या विदर्भ अध्यक्षा महागायिका वैशाली माडे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर काही नेते देखील उपस्थित होते.
अमोल मिटकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या मनाची होतीया काहीली’ ही छक्कड गायला सुरुवात केली.
मात्र, काही क्षणातंच मिटकरी यांचे तोंड वाकडे होऊ लागले, आवजामध्ये बदल होऊ लागला. मिटकरी यांच्या प्रकृतीत झालेला बदल उपस्थितांच्या लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने मिटकरी यांना आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
“माझ्या प्रकृतीत सुधारणा आहे. चिंता करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. आपले जीव धोक्यात घालून भेटायला येवू नये,” अशी विनंती देखील मिटकरी यांनी केली आहे.⭕